नागपूर

...अन्यथा शिवसेनेसोबत युती नाही : मुख्यमंत्री फडणवीस

आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपची भूमिका शिवसेनेला मान्य असेल तर युतीचा विचार होईल, अन्यथा नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिलेत. त्यामुळे युती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Dec 17, 2016, 07:48 PM IST

....हे ठरलंय महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस रेल्वे स्टेशन!

काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे सरकार वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर रेल्वे स्टेशन आता कॅशलेस बनण्याच्या मार्गावर आहे. 

Dec 17, 2016, 03:52 PM IST

ट्रक - ट्रॅव्हल बसमध्ये अपघात, दोन ठार

नागपूर मार्गावर सेलडोह येथे आज सकाळी ७.३५ च्या दरम्यान ट्रक आणि ट्रव्हल्सचा अपघात झालाय. 

Dec 17, 2016, 02:48 PM IST

विदर्भाला न्याय द्यायला भाजप सरकार अपयशी : राधाकृष्ण विखेपाटील

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. दरम्यान, विदर्भ प्रश्नावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास मंत्री गायब होते. विदर्भातील भाजपाचे किती आमदार उपस्थित आहेत, असा प्रश्न उपस्थित करुन विदर्भाला न्याय द्यायला हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप केला.

Dec 16, 2016, 11:05 PM IST

मंत्री महादेव जानकरांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच!

भाजप सरकारमधील मंत्री महादेव जानकरांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. यासाठी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केलीय. आपल्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली. देसाईगंज न्यायालयानं चौकशीसाठी बोलावल्याप्रकरणीही जानकरांनी याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

Dec 16, 2016, 06:16 PM IST

मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केल्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी आज विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. विरोधकांनी प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार घातला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Dec 15, 2016, 09:59 PM IST

युती सरकारमधील राज्यमंत्री गुलाबराव गावंडे राष्ट्रवादीत दाखल

राष्ट्रीय जनता दलाची संपूर्ण राज्य शाखाच राष्ट्रवादीत विलीन करून जेमतेम 24 तास झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला धक्का दिला. 1995-99 दरम्यान युती सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

Dec 15, 2016, 08:53 PM IST

नागपुरात भाजप नेत्यानं उघडपणे लावल्या रेड्याच्या झुंजी

नागपुरात भाजप नेत्यानं उघडपणे लावल्या रेड्याच्या झुंजी

Dec 15, 2016, 04:09 PM IST

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मराठा मूकमोर्चाचं वादळ

राज्यात 52 मोर्चाचे आयोजन केल्यानंतर आज सकल मराठा समाजा तर्फे राज्यव्यापी मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलयं. या निमित्ताने मराठा कुणबी समाज आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडीअमपासून मोर्चाला सुरूवात होईल, तर मॉरीस टी पॉइंट येथे मोर्चा संपणार आहे.

Dec 14, 2016, 09:29 AM IST

...जेव्हा चप्पल न घालताच दाखल झाले आमदार महोदय!

विधानभवनाच्या आवारात आमदार तुकाराम काते आज चप्पल न घालताच आलेले दिसले. 

Dec 14, 2016, 09:19 AM IST

आज आमदार मराठा मोर्चा 'हायजॅक' करणार?

नागपुरात आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. 

Dec 14, 2016, 07:59 AM IST