बाळासाहेबांसारखा नेता होणे नाही- रतन टाटा
टाटा समुहाचे प्रमुख असणाऱ्या रतन टाटांनी नुकतीच निवृत्त स्वीकारली. त्यानंतर त्यांनी काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.
Jan 13, 2013, 01:40 PM ISTबाळासाहेबांचं राज्याला मोठं योगदान आहे- शरद पवार
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात गैर काय, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. बाळासाहेबांचं राज्याला मोठं योगदान आहे, असंही ते म्हणाले.
Jan 7, 2013, 11:53 PM ISTचौथरा हटविण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह
गेल्या दोन दिवसात शिवसेना नेत्यांच्या महापालिका आयुक्तांसोबत बैठका झाल्या आहेत. या बैठकीत शिवसेनेनं आपली मागणी आयुक्तांपुढे मांडली मात्र त्यावर शिवसेनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आज बाळासाहेबांच्या महानिर्वाणाला एक महिना पूर्ण होतोय.
Dec 17, 2012, 02:37 PM ISTशिवसेना आज चौथरा विधीवत हलविणार
बाळासाहेब ठाकरेंवर अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणी बांधण्यात आलेला चौथरा अखेर हलवण्यात येणार आहे. शिवसेना स्वतःच हे बांधकाम काढणार असल्यानं गेले दोन-तीन आठवडे सुरू असलेल्या वादावर पडदा पडणार आहे.
Dec 17, 2012, 10:26 AM ISTसेनाच हलवणार शिवाजी पार्कवरचा बाळासाहेबांचा चौथरा...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या चौथऱ्याचा वाद अखेर संपुष्टात येणार आहे. लवकरच विधिवत हा चौथरा शिवाजी पार्कवरू हटवण्यात येणार असल्याची भूमिका शिवसेनेनं घेतलीय.
Dec 14, 2012, 06:35 PM ISTअबु आझमींचा शिवतीर्थ नावाला विरोध
समाजवादी पार्टीने मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कचे नाव बदलण्यास विरोध केला आहे. पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विरोध करताना स्पष्ट केलंय, या मैदानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शिवतीर्थ नाव देणे योग्य नाही.
Dec 11, 2012, 03:56 PM ISTशिवाजी पार्कचं कायद्यानुसार नामांतर करू - सेना
शिवाजी पार्कचं शिवतीर्थ नामांतर करण्याचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. कायद्यानुसार नामांतर करुच, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं या मुद्यावर विरोधाची भूमिका घेतल्यानं शिवसेना एकाकी पडलीय. तर वरिष्ठ नेते या प्रकरणी निर्णय घेतील अशी भूमिका भाजपनं घेतल्यानं शिवसेनेच्या समस्येत भर पडलीय.
Dec 11, 2012, 10:57 AM ISTलष्कर घेणार शिवाजी पार्कचा ताबा
दादर येथील शिवाजी पार्कचा वाद चिघळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेत ती जागा सोडण्यास शिवसैनिकांनी नकार दिलाय. तसेच पालिकेत शिवतीर्थ असे नामकरण करण्यावरून जोरदार विरोध झालाय. त्यातच शिवाजी पार्कचा ताबा लष्कर घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
Dec 11, 2012, 10:11 AM ISTशिवाजी पार्कवरील वीट हलवू देणार नाही - राऊत
मुंबईतील शिवाजी पार्क हे आमच्यासाठी शक्तिस्थळ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावरील अंत्यसंस्काराची जागा ही तमाम शिवसैनिक आणि शिवप्रेमींसाठी शक्तिस्थळच आहे. येथील एकही वीट हलवू देणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
Dec 9, 2012, 04:04 PM IST‘बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही’
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही, असा शिवसेनेने सरकारला इशारा दिलाय. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या जागेचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
Dec 8, 2012, 12:44 PM ISTउद्धव ठाकरे आता सामनाचे संपादक
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राचे संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलीये. बाळासाहेब ठाकरेंचे नाव संस्थापक संपादक म्हणून टाकण्यात आलयं.
Dec 4, 2012, 11:57 AM ISTसैनिकांनो रडायचं नाही लढायचं - उद्धव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार असून महाराष्ट्राच्या विधानसभेवर मानाने भगवा फडकविणार असल्याची शपथ आज शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे घेतली.
Dec 3, 2012, 03:49 PM ISTबाळासाहेबांच्या नावे मुंबईत आरोग्य विद्यापीठ!
मुंबईत आता मुंबई महापालिका आंतरराष्ट्रीय दर्जाचे आरोग्य विद्यापीठ स्थापन करणार आहे. या विद्यापीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे.
Dec 3, 2012, 09:36 AM ISTबाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागेचा शोध
शिवसेनेनं शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध करणा-यांना कडक इशारा दिलाय. अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवसेना दुस-या जागेच्या शोधात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलय
Dec 2, 2012, 06:38 PM ISTबाळासाहेब स्मारकाबाबत सेनेची मवाळ भूमिका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील स्मारकाचा वाद आता निवळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
शिवाजी पार्कमध्ये स्मारक व्हावं, असा शिवसेनेने आग्रह धरला नव्हता, असे शिवसेना नेते खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुले सेनेची मवाळ भूमिका दिसत आहे.