ठाणे दुर्घटना : राष्ट्रवादी नगरसेवकासह ८ जणांना कोठडी
शिळफाटा बिल्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ९ जणांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बिल्डिंग मटेरियल सप्लायर अफराज याला आज सकाळी अटक करण्यात आली.
Apr 7, 2013, 03:21 PM ISTपुणे विकास आराखडा बिल्डरधार्जिणा?
जुन्या पुण्याच्या बहुचर्चित विकास आराखड्याला अखेर महापालिकेची मंजुरी मिळाली आहे. मात्र सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला हा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय.
Jan 8, 2013, 06:26 PM ISTबिल्डरांकडून व्हॅटचे पैसे मिळवण्यासाठी इथे क्लिक करा!
बिल्डरांकडून मनमानीपणे व्हॅटची वसुली सुरू असून या व्हॅट वसुलीमुळे धास्तावलेल्या ग्राहकांच्या मदतीला आता www.flatvat.com ही वेबसाइट धावून आली आहे. व्हॅटचे पैसे परत कसे मिळवायचे याबाबचा सल्ला मिळू शकणार आहे.
Nov 6, 2012, 04:43 PM ISTबिल्डर आणि पुणे महापालिकेचं साटंलोटं!
पुणे महापालिकेच्या अजब कारभाराचा धक्कादायक नमुना समोर आलाय. अपूर्ण बांधकामाला पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रताप महापालिका प्रशासनाने केलाय. या प्रकारामुळे इथले रहिवासी प्रचंड त्रस्त आहेत. मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे, बिल्डर आणि महापलिका प्रशासन यांच्यातील साटलोटं यानिमित्ताने उघडकीस आल आहे.
Oct 22, 2012, 04:00 PM IST`झी २४ तास`च्या `स्टिंग ऑपरेशन`मध्ये बिल्डरांचा पर्दाफाश
मुंबईचे बिल्डर हवेत घरं बांधण्यात उस्ताद आहेत. झी बिझनेसच्या एका इन्वेस्टिगेशनमध्ये याबाबतची खरीखुरी माहिती समोर आली. प्रोजेक्टला साधी प्राथमिक मंजूरी मिळण्याआधीच ग्राहकांना घराचं स्वप्न दाखवण्यात येतंय. एवढंच नाहीतर बिल्डर ग्राहकांकडे 40 टक्के पर्यंत ब्लॅकमनीची मागणी करतायेत.
Oct 21, 2012, 09:19 AM IST‘व्हॅट बिल्डरांनीच भरायचा, खरेदीदारांनी नाही!’
व्हॅटची म्हणजेच घरविक्रीच्या मूल्यवर्धित कर हा बिल्डरांनीच भरायचाय... ग्राहकांनी नाही, अशा शब्दात ग्राहकांना दिलासा देतानाच सर्वोच्च न्यायालयानं व्हॅटची रक्कम भरण्यासाठी बिल्डरांना मुदतवाढ देऊन त्यांनाही दिलासा दिलाय.
Aug 29, 2012, 12:53 PM ISTहिरानंदानी बिल्डर घोटाळेबाज, गुन्हा दाखल
महाराष्ट्र लाचलुचपत विभागानं बिल्डर निरंजन हिरानंदानी आणि नागरी विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव टी.सी.बेन्जामीन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारी जमीन व्यावसायिक कारणांसाठी वापरल्याचा हिरानंदानी बिल्डरवर आरोप आहे.
Jul 6, 2012, 08:35 AM IST‘हिरानंदानी’ची होणार चौकशी
अॅन्टी करप्शन स्पेशल कोर्टानं हिरानंदानी बिल्डर विरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारी जमिनीचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केल्याचा आरोप हिरानंदानी बिल्डरवर आरोप आहे.
Jul 3, 2012, 10:43 PM ISTबिल्डरचा पोलिस एजंट, रहिवाशांशी करतोय सेटलमेंट!
एका बिल्डरधार्जिण्या एसीपीनं स्वत:च्या स्वार्थासाठी झोपडपट्टीधारकांवर दबाव आणायला सुरूवात केलीय. अनिल कराडे असं या पोलीस अधिका-याचं नाव आहे. विलेपार्ले पूर्व भागातील आंबेडकर नगर परिसरातील जागा बिल्डरला द्यावी यासाठी एजंट बनून सेटलमेंट करण्याचं काम कराडे करतोय.
Jun 18, 2012, 02:57 PM ISTबिल्डरच्या गुंडांची गावकऱ्यांना मारहाण
कल्याणमध्ये बिल्डरच्या गुंडांनी केलेल्या मारहाणीत दोन गावकरी गंभीर जखमी झालेत. जमीन बळकावण्यासाठी निर्मल लाईफ स्टाईलच्या बिल्डरनं मारहाण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.
Nov 10, 2011, 06:04 AM IST