मनसे

Mumbai News : मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मनसेचा 'खळखट्ट्याक' इशारा!

Mumbai News : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत आज संपतेय. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिका (BMC) दंडात्मक कारवाई करणारा आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.

Nov 25, 2023, 08:36 PM IST

लोकसभेसाठी मनसे कामाला, टेन्शन कुणाला? 'या' 20 मतदार संघात उमेदवार देणार

लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. त्यानुसार मनसेने लोकसभा निवडणुसाठी कंबर कसली आहे. राज्यात तब्बल 20 जागांवर मनसे उमेदवार देण्याची चर्चा असून त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरु केली आहे. 

Nov 21, 2023, 06:49 PM IST

मिशन बारामती, राज ठाकरेंची रणनीती! चर्चा वसंत मोरेंची

लोकसभेसाठी मनसे कामाला लागलीय, विशेष म्हणजे पवारांच्या बालेकिल्ल्यावर राज ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलंय. वसंत मोरेंसारख्या मनसेतील लोकप्रिय नेत्यावर बारामतीची जबाबदारी येऊ शकते.. मात्र अचानक बारामती लोकसभा मतदारसंघात मनसे जोर का लावणार आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय.

Oct 20, 2023, 10:57 PM IST

शासन 'राज ठाकरें'च्या दारी, 'मंत्र्याने घरी जाऊन चर्चा करण्याची राज्यात नवी पद्धत'

टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. टोल वसुलीत कशा पद्धतीनं अनियमतता आहे, काय बदल अपेक्षित आहेत याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी मांडला आणि राज्य सरकारनं तातडीनं कार्यवाही सुरु केली. मात्र याच मुद्द्यावरुन शासन राज ठाकरेंच्या दारी म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय. 

Oct 13, 2023, 07:29 PM IST

राज्यातले 44 टोलनाके बंद होणार? वाचा टोलसंदर्भातल्या 20 महत्त्वाच्या मागण्या

राज्यातील टोलच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. याबैठकीत काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आता टोलनाक्यांवर सरकार आणि मनसेच्या सीसीटीव्हीची नजर असणार आहे. तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.

Oct 13, 2023, 02:03 PM IST

घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वादः ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बोर्ड काढले, गुजराती भाषिक रस्त्यावर

घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद पेटणार आहे.  मनसे आणि ठाकरे गटाने बोर्ड काढल्यानंतर आक्रमक झालेले गुजराती बांधव रस्त्यावर उतरले आहेत.   

Oct 11, 2023, 07:38 PM IST

मनसेचं एक पाऊल पुढे! लोकसभेसाठी 13 मतदारसंघांचे उमेदवार ठरले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी आगामी निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यासाठी मुंबई, पुण्यासह कल्याण, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर यासह एकूण 13 लोकसभा मतदारसंघांत चाचपणी सुरु करण्यात येत आहे. 

Oct 7, 2023, 03:41 PM IST

राज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या डबेवाल्यांची साद, म्हणतात 'वाघांनो एकत्र या, निवडणुकीत...'

Maharastra Politics : महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पहाता मराठी माणसांच्या भल्यासाठी दोन वाघांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भावना मुंबई डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.

Sep 30, 2023, 11:36 PM IST

मनसेचं एक पाऊल पुढे! लोकसभेसाठी खास रणनिती... 'या' नेत्यांवर सोपवली जबाबदारी

देशात वन नेशन वन इलेक्शनची जोरदार चर्चा सुरु आहे. मोदी सरकार विशेष अधिवेशन बोलवून विधेयक आणणार असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान मनसेने थेट लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे, यासाठी त्यांनी खास रणनिती तयार केली आहे. 

Sep 6, 2023, 04:16 PM IST

नागपुरात मनसे कार्यकर्त्यांची अ‍ॅमेझॉन कार्यालयात तोडफोड, पाकिस्तानी झेंड्याच्या ऑनलाईन विक्रीचा आरोप

मनसे कार्यकर्त्यांनी नागूपरमधल्या अॅमेझोनच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. अॅमेझॉनवरुन पाकिस्तानच्या झेंड्यांची ऑनलाईन विक्रि केली जात असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते कार्यालयात धडकले आणि त्यांनी तोडफो़ड सुरु केली. 

Aug 22, 2023, 02:10 PM IST

'राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे' मनसेच्या खळ्ळ खट्याकवरुन दीपाली सय्यदचा टोला

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे प्रचंड आक्रमक झालीय. राज ठाकरेंच्या दौ-यानंतर मनसेनं ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक सुरू केलंय. संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तोडफोडही केलीय. यावरुन शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं आहे. 

Aug 19, 2023, 01:45 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनसे 3 लोकसभा जागा लढवणार? जाणून घ्या अपडेट

Maharashtra Navnirman Sena: 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Aug 18, 2023, 11:18 AM IST

ठाकरे विरुद्ध ठाकरे ! मुंबईतली युवाशक्ती कोणाच्या बाजूने? आदित्य-अमित आमने सामने

Thackere vs Thackeray : मुंबईतले तरुण कुणाच्या बाजूनं आहेत, याचा कौल पुढच्या महिन्यात मिळणार आहे. मुंबईत पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा धुरळा उडणार आहे. शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिलीच सिनेट निवडणूक आहे. 

Aug 11, 2023, 08:18 PM IST

Maharastra Politics: 'राज ठाकरे महायुतीत येणार नसतील तर...'; सुधीर मुनगंटीवार यांची सडकून टीका!

Sudhir Mungantiwar On Raj Thackeray: राज ठाकरेंना यांना असंच वाटत असेल तर ठीक आहे मग! त्यांना महायुतीत येयचं नसेल. तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत का? असा खोचक सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

Jul 26, 2023, 06:13 PM IST

Video: मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडल्यानंतर अमित ठाकरे हसून म्हणाले, 'मी हॉटेलला...'

Amit Thackeray On Toll Naka Vandalization By MNS Workers: सिन्नरमध्ये समृद्धी एक्सप्रेस वेवरील टोल नाका रात्री अडीचच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. याचसंदर्भात मनसेचे नेते अमित ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 23, 2023, 03:18 PM IST