राणे-भुजबळ यांना शिवसेनेत येण्याचे आठवलेंचे निमंत्रण
शिवसेनचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यामुळे आपल्याला शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली, असे ज्या नेत्यांना वाटते अशा नेत्यांनी आता पुन्हा शिवसेनेत यावे, असा उपरोधिक टोला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आहे.
Oct 17, 2013, 01:37 PM ISTजोशींवर नियतीनंच सूड उगवलाय - छगन भुजबळ
प्रत्येक पद आपल्यालाच मिळावं, हा जोशींचा पहिल्यापासून हव्यास होता. नियतीनं जोशींवर सुड उगवलाय, असा भडीमार भुजबळांनी जोशींवर केलाय.
Oct 15, 2013, 07:51 PM ISTअपमान सहन करणं जोशींचा जन्मसिद्ध हक्क- राणेंचं टीकास्त्र
शिवसेनेतल्या मनोहर जोशी मानापमान नाट्यावर कधीकाळी शिवसैनिक असलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केलाय. “पदांसाठी अपमान सहन करत राहणं हा जोशींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो ते सहन करत राहणारच, असा वार राणेंनी जोशींवर केला.”
Oct 15, 2013, 07:39 PM ISTमनोहर जोशींवर राणेंचा प्रहार, भुजबळांनीही केलं लक्ष्य!
“अपमान सहन करत राहणं हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि अपमान करून घेत पदं मिळवत राहणं हे मनोहर जोशींचं ब्रिद आहे”, अशा शब्दांत नारायण राणेंनी टीकास्त्र सोडलंय. बाळासाहेबांनी जोशींवर प्रत्येक वेळी विश्वास टाकला आणि त्यांनी मात्र कायम विश्वासघात केला, असं राणे म्हणाले.
Oct 15, 2013, 07:15 PM ISTराष्ट्रवादीला आला जोशी सरांचा पुळका!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशींसंदर्भात घडलेल्या अपमाननाट्यानंतर आता राष्ट्रवादीला जोशी सरांचा पुळका आलाय.
Oct 15, 2013, 04:17 PM ISTपक्षप्रमुखांचा आदेश धुडकावल्याने मनोहर जोशी पायउतार...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित करणा-या मनोहर जोशींना लेखी माफीनामा देण्याचा आदेश मनोहर जोशींनी धुडकावून लावला. मात्र, हा आदेश जोशी सरांनी धुडकावून लावल्यामुळेच त्यांच्यावर दसरा मेळाव्यात व्यासपीठावरून पायउतार होण्याची वेळ आली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Oct 15, 2013, 12:44 PM ISTमनोहर जोशीं नॉट रिचेबल, पुढे काय ?
दसरा मेळाव्यातील अपमान नाट्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशीं नॉट रिचेबल आहेत. कुठे गेलेत याचा पत्ता नाही. नाराज जोशी पुढे काय करणार याची उत्सुकता लागली आहे. ते सेनेला जय महाराष्ट्र करणार का, चाचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.
Oct 15, 2013, 09:23 AM ISTनाराज जोशी सर कुठे गेले?
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतलेले शिवसेना नेते मनोहर जोशी कुठं गेलेत, याचा पत्ता सरांच्या कार्यकर्त्यांनाही नाही.
Oct 14, 2013, 07:28 PM ISTशिवसेनेची वाटचाल नेमकी कुठे?
मनोहर जोशींचा अपमान होत असताना शिवसेना ज्येष्ठ नेते तसंच पक्षप्रमुख गप्प का बसले? शिवसेनेतल्या नव्या अधोगतीचीच ही नांदी म्हणायची का?
Oct 14, 2013, 11:09 AM ISTमनोहर जोशींवर व्यासपीठ सोडण्याची नामुष्की
जोशींविरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू झाल्यावर मनोहर जोशींवर व्यासपीठ सोडण्याची नामुष्की ओढावली.
Oct 13, 2013, 08:12 PM IST... असा होता शिवसेनाप्रमुखांनंतरचा पहिला दसरा मेळावा!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये भरला
Oct 13, 2013, 07:59 PM ISTउद्धव ठाकरेंशी चर्चेनंतर सरांचं घुमजाव…
मनोहर जोशींच्या वक्तव्यानं सध्या शिवसेनेत फायलिन निर्माण झालंय. थेट नेतृत्वावर टीका करत पंतानी स्वत:वरच वादळ ओढवून घेतलं. पण...
Oct 12, 2013, 10:21 PM IST`जोशींना दादरमध्ये तरी कुणी ओळखतं का?`
स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मनोहर जोशींवर तोंडसुख घेतलंय. `जोशींना दादरमध्ये तरी कुणी ओळखतं का? असा सवाल करत नितेश यांनी जोशींवर टीका केलीय.
Oct 12, 2013, 08:10 PM ISTजोशी यांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही - राज ठाकरे
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करण्याच नकार दिलाय.
Oct 12, 2013, 02:39 PM ISTराज-उद्धव यांनी एकत्र यावं, मी निवृत्त होणार नाही - जोशीसर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं, या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत मी राजकारणातून निवृत्त होणार नाही, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.
Oct 12, 2013, 10:02 AM IST