www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं, या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत मी राजकारणातून निवृत्त होणार नाही, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.
मनोहर जोशी यांनी जाहीर मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना आपल्या मताचा पुनरउच्चार केला. दादरमध्ये पराभव का झाला, यावरही मनोहर जोशींनी टिप्पणी केली की, जिथे शिवाजी तिथे सूर्याजी पिसाळ. सूर्याजी पिसाळ, अशा शब्दात त्यांनी आपल्या पराभवाला जबाबदार असणा-यांना टोला लगावला आहे.
बाळासाहेबांसारखं नेतृत्व असतं, तर एव्हाना स्मारक झालं असतं, असं म्हणत मनोहर जोशींनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच टोला हाणलाय. स्मारकाच्या मुद्द्यावरुन बाळासाहेबांनी सरकारही पाडलं असतं, असं मनोहर जोशी म्हणाले. त्याचबरोबर बाहेरचा उमेदवार दिला म्हणूनच दादरमध्ये शिवसेनेचा पराभव झाला, असं म्हणत मनोहर जोशींनी उद्धव ठाकरेंचे कानही टोचलेत.
दरम्यान मनोहर जोशींच्या स्मा्रकाबद्दलच्या विधानानंतर भरतकुमार राऊतांनी प्रतिवाद केला आहे. ही स्मारकाबाबत सारवासारव असल्याचे म्हटले आहे. बाळासाहेबांची शिकवण होती, आदेशाची वाट पाहू नका. त्यांचे स्मारक व्हायला पाहिजे. मात्र, ते जर होत नसेल तर आम्ही त्यांची लेकरं म्हण्यास मी नालायक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ