मुंबई महापालिका निवडणूक

शिवसेनेसाठी कठीण परीक्षेची घडी

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्याने मुंबईत आता प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध भाजपा असाच सामना रंगलेला पहायला मिळणार आहे. 2015 ला झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत जे झाले त्याची पुनरावृत्ती आता मुंबई महापालिका निवडणुकीत पहायला मिळेल. मागील 20 वर्ष मुंबईत शिवसेना-भाजपाची एकत्र सत्ता होती. या कालावधीतील मुंबई महापालिकेच्या सर्व निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्र लढले. आता एकमेकांपासून फारकत घेतल्यानंतर प्रथमच मुंबईत हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर येणार आहेत. यात खरी परीक्षा असणार आहे ती शिवसेनेची. 

Jan 30, 2017, 01:47 PM IST

मुंबईत भाजपचाच महापौर - चंद्रकांत पाटील

मुंबईतली युती तुटली, तरी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातली यूती कायम ठेवावी असं आवाहन महसूल मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. 

Jan 30, 2017, 01:05 PM IST

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय. आधी कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र आंबेरकर हेसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

Jan 29, 2017, 08:23 AM IST

'आज पाणी पितोय, २१ तारखेला पाणी पाजणार आहे'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गोरेगावच्या भाजप संकल्प मेळाव्यात भाषण करत होते, तेव्हा ते सलग बोलत होते, त्यांचे सलग आरोप शिवसेनेवर सुरू होते

Jan 28, 2017, 08:17 PM IST

भाजपमध्ये विविध राजकीय पक्षांतून इनकमिंग सुरुच

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये विविध राजकीय पक्षांतून इनकमिंग सुरुच आहे. 

Jan 24, 2017, 07:44 AM IST

युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तीन वाजता भाजप नेत्यांची बैठक बोलावलीय. जागावाटपासाठी शिवसेना भाजप नेत्यांची बैठकीची  कालची तिसरी फेरी निष्फळ ठरली आहे. 

Jan 22, 2017, 01:03 PM IST