मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज ख-या अर्थानं रंगत येणार आहे. मुंबईत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष ठाकरे आमने-सामने उभे ठाकणार आहेत.
Feb 13, 2012, 04:06 PM ISTमनसेची जंग, सेना-राष्ट्रवादी करते बेरंग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदान मिळू नये म्हणून दोन्ही पक्ष एकत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलं आहे. बोरिवलीत रोड शोच्या दरम्यान त्यांनी ही टीका केली.
Feb 5, 2012, 06:09 PM ISTकमळ रुतलं बंडखोरीच्या चिखलात
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनीच बंडखोरीचे निशाण फडकावलं आहे. विलेपार्लेत प्रभाग क्रमांक ८० मध्ये पराग अळवणींच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर आता राज पुरोहितांच्या सूनेनंही तोच कित्ता गिरवला आहे.
Jan 31, 2012, 03:49 PM ISTमुंबई पालिकेसाठी भाजपाची दुसरी यादी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहे. या यादीत विद्यमान नगरसेवक भालचंद्र शिरसाट वगळता नवीन चेहऱ्यांना पक्षाने पसंतीक्रम दिला आहे.
Jan 31, 2012, 01:28 PM ISTउदंड जाहले बंडखोर, सेनेच्या जीवाला घोर
माटुंगा, वडाळा, दादर पाठोपाठ आता घाटकोपरच्या भटवाडी प्रभागात देखील शिवसेने समोर बंडखोरीचे आव्हान उभं ठाकलं आहे. सई शिर्के यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या नगरसेवक राजा चौगुलेंनी बंडाचे निशाण फडकावलं आहे.
Jan 31, 2012, 01:12 PM ISTशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीचे आव्हान
शिवसेनेत पुन्हा बंडखोरी झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दादरमधल्या १८५ प्रभागाची उमेदवारी प्रविण शेट्ये यांना दिल्याने संजय भरणकर आणि भरत राऊत या माजी शाखा प्रमुखांनी बंडाचे निशाण फडकावलं आहे.
Jan 31, 2012, 11:14 AM ISTशौचालयं गेली कुठे ??
शिवसेना-भाजप युतीनं २००७ च्या निव़डणूकीत ३५ हजार शौचालयं बांधण्याचं वचननाम्यात आश्वासन मुंबईकराना दिलं होतं. युतीच्या वचनाम्यातील शौचालये बांधली न गेल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
Jan 17, 2012, 08:47 AM ISTआघाडीत पुन्हा बिघाडी, स्वबळावर लढणार?
वॉर्डवाटपावरुन मुंबईत आघाडीत बिघाडीची चिन्ह आहेत. मुंबईत आघाडी होऊन आठवडा उलटत आला तरी, अजूनही वॉर्डवाटपाचा घोळ कायम आहे. वर्चस्व असलेल्या भागात राष्ट्रवादीला जागा हव्या आहेत, तर हक्काच्या जागा सोडण्यास काँग्रेसचा विरोध आहे. यातत काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये असल्याचं समजत.
Jan 16, 2012, 06:29 PM ISTमुंबईत आघाडीला वार्ड वाटपात अडचणी!
दोन्ही काँग्रेसनं आघाडीची घोषणा केली असली तरी वॉर्ड वाटप करताना मात्र नाकीनऊ आलंय. आजच्या बैठकीतही मोठा खल होऊन वॉर्ड वाटपाचा तिढा सुटलेला नाही. आता सोमवारी पुन्हा दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
Jan 13, 2012, 07:44 PM ISTघड्याळाने साधली 'वेळ',आघाडीचा बसला 'मेळ'!
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्यासंदर्भात तिढा सुटला. मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षावर जवळपास अडीच तासांच्या बैठकीनंतर आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त आहे.
Jan 11, 2012, 08:21 AM ISTनामदेव ढसाळांचा इशारा
शिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळ यांनी आमच्या रामदास आठवले यांना आमच्या जागांबाबत ११ तारखेपर्यंत निर्णय घ्या असा निर्वाणीचा इशारा दिला.
Jan 9, 2012, 03:20 PM ISTआघाडीसाठी दोन्ही काँग्रेसच्या ‘जोर बैठका’!
मुंबई महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी संदर्भातील आज सकाळी झालेली बैठक तोडग्या विना संपली. सायंकाळी पुन्हा दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन वार्ड निहाय आढावा घेणार असल्याची माहिती झी २४ तासला दोन्ही पक्षातील सूत्रांनी दिले.
Jan 7, 2012, 07:36 AM ISTकामातांचा आघाडीत खोडा
का करावी. काँग्रेस एकट्याने लढून सत्ता आणण्यास समर्थ आहे, राष्ट्रवादी मागे फरफट नको, असा विरोध मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी व्यक्त केला आहे.
Jan 6, 2012, 08:14 PM IST