'ब्लॉक' करणार मुंबईकरांना 'मेगाब्लॉक'....
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गासह सीएसटी-कुर्ला आणि वडाळा-वांद्रे स्थानकांदरम्यान आज मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०:१३ ते दुपारी ३: ४८ या दरम्यान हा मेगाब्लॉक असणार . त्यामुळे अप धीमा गतीच्या मार्गावरील ठाकुर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्टेशन्सवर लोकल थांबणार नाहीत.
Dec 18, 2011, 05:48 AM ISTप. रेल्वेचा 'मेगाब्लॉक', प्रवासी मात्र 'ब्लॉक'
आज पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी वेठीला धरले जाणार आहेत. मेगाब्लॉकमुळे बेस्टच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. डीसी विद्युत कर्षणाचे एसी विद्युत कर्षणामध्ये रुपांतरण करण्यासाठी पश्चिम रेल्वे आज मेगा ब्लॉक घेणार आहे.
Nov 13, 2011, 04:39 AM ISTपश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेने ट्रॅक्शन नेटवर्क डीसी (डायरेक्ट करंट) ते एसी (अल्टरनेटिंग करंट) बदलण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. बांद्रा ते भाईंदर दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० दरम्यान रेल्वेसेवा पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. विलेपार्ले ते बोरिवली दरम्यान टॅक्शन नेटवर्कच्या कामासाठी हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
Nov 11, 2011, 05:00 PM IST