कापूस निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे आंदोलन
केंद्राने कापूस निर्यातीवर बंदी घातल्यानं त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध शेतकरी संघटना निर्यातबंदीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.
Mar 7, 2012, 04:57 PM ISTअफू पिकाला मान्यता द्या- शेतकरी संघटना
राज्यभरात फोफावलेल्या अफूच्या पिकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असताना आता अफू पिकाला मान्यता मिळावी म्हणून शेतकरी संघटना आंदोलनाचं रणशिंग फुंकणार आहे.
Feb 29, 2012, 07:16 PM ISTअफूच्या शेतीवरून पोलिसच संशयाच्या फेऱ्यात
सांगलीतल्या अफूच्या शेती प्रकरणामुळं आता राजकीय नेत्यांनाही नशा चढू लागली आहे. अफूच्या शेतीवरुन वनमंत्री पतंगराव कदम यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलंय. पोलिसांनी हप्ते घेणं थांबवलं तर काम चांगलं होईल, असा टोला पतंगरावांनी हाणला आहे.
Feb 29, 2012, 04:06 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांसमोर धामणगावच्या सभेत आत्महत्येचा प्रयत्न करणा-या अरुण सभाणे या शेतक-याची प्रकृती गंभीर आहे. त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलय. कापसाच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी सभाणे यांनी केली होती.
Dec 4, 2011, 05:14 PM ISTशेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला चोप
सोलापूरमधल्या पंढरपूर इथं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मारुती जाधव या कार्यकर्त्याला ही मारहाण केली आहे. याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nov 9, 2011, 05:48 AM ISTशेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण !
ऊस तोडणी बंद करण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना सांगली जिल्ह्यात वाळव्यात घडली आहे. 'हुतात्मा' साखर कारखान्याच्या काही जणांनी ही मारहाण केल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
Nov 1, 2011, 12:54 PM ISTउसाचा गोडवा कायम राहणार ?
सांगलीत उस दर निश्चिती संदर्भात शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या तीन नोव्हेंबर पर्यंतच्या बैठकीपर्यंत सांगलीतील सर्व साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
Oct 30, 2011, 10:16 AM IST