बॅड न्यूज, पेट्रोलनंतर अनुदानित सिलिंडर महागला
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दे धक्का दिलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीपाठोपाठ आता अनुदानित सिलिंडरच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आली आहे.
Sep 1, 2016, 02:40 PM ISTविनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त
विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. सिलिंडरच्या दरात ४ रूपयांनी घट केली आहे.
Apr 2, 2016, 08:08 AM ISTविनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला, विमान इंधन स्वस्त
गृहीणींसाठी एक वाईट बातमी. विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला आहे. ६१.५० रुपयांनी सिलिंडर महागलाय. तर विमान इंधन १.२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. विमान इंधनाच्या किंमतीत गेल्या तीन महिन्यात तीनवेळा कमी करण्यात आलेय.
Dec 1, 2015, 05:19 PM ISTआता, घरच्या गॅस सिलिंडरचे पैसेही ऑनलाईन भरा!
तुम्हीही घरी एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्या एक खुशखबर आहे. आता तुम्हाला घरी गॅस सिलिंडर आल्यावर डिलिव्हरी बॉयकडे पैसे द्यावे लागणार नाहीत... कारण, देशात पहिल्यांदाच गॅस सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध होतेय.
Nov 28, 2015, 02:10 PM ISTस्वयंपाकाचा अनुदानित सिलिंडर ४२ रुपयांनी स्वस्त
मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिलेय. स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडर दरात ४२ रुपयांनी कपात केली आहे. तर एटीएफ तसेच जेट इंधनाच्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, विनाअनुदानित रॉकेलच्या दरात ५४ पैशांची वाढ झाली असून ते आता प्रति लिटर ४३.१८ रुपये झाले आहे.
Oct 1, 2015, 04:44 PM ISTकाळबादेवीतल्या गोकूळनिवास इमारतीला आग
काळबादेवीतल्या गोकूळनिवास इमारतीला आग
May 9, 2015, 08:16 PM ISTआता, अनुदानित सिलिंडरसाठीही मोजा संपूर्ण किंमत!
आता, अनुदानित सिलिंडरसाठीही मोजा संपूर्ण किंमत!
Dec 5, 2014, 10:28 PM ISTआता, अनुदानित सिलिंडरसाठीही मोजा संपूर्ण किंमत!
येत्या एक जानेवारीपासून घरगुती गॅसच्या ग्राहकांना अनुदानित सिलिंडरही पूर्ण किंमतीत घ्यावा लागणार आहेत. कारण अनुदानित असलेल्या पहिल्या १२ सिलिंडर्सच्या अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
Dec 5, 2014, 09:25 PM ISTडिझेल ५० पैशांनी महागले, सिलिंडर १०७ रूपयांनी स्वस्त
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केलेय. अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून १२केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारकडून विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत १०७ रुपयांनी कपात करण्यात आली. तर दुसरीकडे डिझेलमध्ये ५० पैशांनी वाढ करण्यात आलेय.
Feb 1, 2014, 07:54 PM ISTसहा ऐवजी आता नऊ सिलिंडर
घरगुती सिलिंडर आता सहावरून नऊवर करून खुश खबर केंद्राने दिली आहे. मार्चपर्यंत सहा अनुदानित सिलिंडरवर जादा अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आता सहा ऐवजी नऊ सिलिंडर मिळणार आहेत.
Jan 17, 2013, 01:30 PM ISTसातवा, आठवा आणि नववा सिलिंडरही थोड्या स्वस्तात?
सहा सिलिंडर अनुदानित दराने आणि त्यापुढील बाजारदराने देण्याच्या निर्णयापासून लवकरच ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jan 9, 2013, 03:47 PM ISTआता ६ ऐवजी ९ सिलिंडर अनुदानित दरात
अनुदानित सिलिंडरची मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी केली आहे. यापुढे दरवर्षी ६ ऐवजी ९ सिलिंडर अनुदानित दरात मिळणार आहेत. लवकरच या घोषणेची अंमलबजावणी होणार आहे.
Dec 11, 2012, 08:57 PM ISTपिवळे-केशरी कार्डधारकांना नऊ सिंलिंडर
पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांना सहा ऐवजी नऊ सिलिंडर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील काही जनतेला हा फायदा होणार असल्याने सर्वसामान्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहे.
Nov 7, 2012, 07:36 PM IST