www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केलेय. अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून १२केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारकडून विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत १०७ रुपयांनी कपात करण्यात आली. तर दुसरीकडे डिझेलमध्ये ५० पैशांनी वाढ करण्यात आलेय.
केंद्र सरकारने गुरुवारीच अनुदानित सिलिंडरची संख्या १२ करण्याचा निर्णय घेतला होता. एकीकडे सिलिंडरच्या किमतीत कपात केली जात असतानाच डिझेलच्या किमतीत मात्र प्रतिलिटर ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे डिझेलची दरवाढ करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेय. डिझेलची दरवाढ झाल्यामुळे भाजीपाला, कडधान्ये यांच्यासह मालवाहतूक आणि बसप्रवास महाग होऊ शकतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.