मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही- सुप्रिया सुळे
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही. राज्यात अजितदादा हे सक्षम आहे, त्याचा प्रशाकीय अनुभव दांडगा आहे आणि तो भाषणही चांगलं करतो, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणले आहे.
May 13, 2014, 09:38 PM ISTराणे, शिंदे, मुंडे, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे यांची कसोटी
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे आदी दिग्गजांची कसोटी लागणार आहे. तर कोकणात सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे लक्ष आहे. नीलेश राणेविरूद्ध विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत आहे.
Apr 17, 2014, 10:12 AM IST`बटाटावडा` आणि `सूप` आम्ही काढणार नाहीत
महाराष्ट्रात काका-पुतण्याचं दूर जाणं तसं जनतेला वेगळं आणि आश्चर्यकारक वाटत नाही. राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दूर जातांना जनतेनं पाहिलं आहे.
Apr 7, 2014, 11:23 AM ISTभुजबळांच्या बालेकिल्ल्यात `ताईं`ची झाडाझडती!
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ रांचीमध्ये शक्तीप्रदर्शन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नाशकात ठाण मांडून होत्या. मात्र नेहमी युवती काँग्रेसच्या कार्यक्रमात दिलखुलास वावरणाऱ्या सुप्रियाताईंचा रुद्रावतार नाशिकच्या पदाधीकाऱ्यांनी बघितला.
Oct 25, 2013, 05:35 PM ISTराष्ट्रवादी युवती काँग्रेसची विभागीय फळी
युवती काँग्रेसच्या विभागीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, आमदार विद्या चव्हाण यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.
Jul 25, 2013, 03:17 PM ISTदादांच्या पाठिशी सुप्रियाताई
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेताल व्यक्तव्य केल्यानंतर माफी मागितली. अजितदादांनी चौथ्यांदा माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे `त्या` वक्तव्याच्या विषयावर पडदा पडला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
Apr 9, 2013, 03:29 PM ISTअजितदादांच्या आदेशाला केराची टोपली!
पिंपरी-चिंचवडमध्ये खुद्द अजितदादांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा गाजावाजा करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली. त्यासाठी प्रत्येक शहरात युवतींच्या सदस्य नोंदणीचे आदेश देण्यात आले. पण पिंपरी-चिंचवडमध्ये थेट अजित दादांनी पत्र पाठवूनही सदस्य नोंदणी मध्ये नगरसेवक यशस्वी झालेले नाहीत.
Mar 3, 2013, 06:51 PM ISTदिल्लीत दाखवला सुप्रिया सुळेंनी मराठी बाणा
‘श्रीमती सुप्रिया सुळे... आप आप भी मराठी मे बोलना चाहेंगे....‘ असं संसंदेतील अध्यक्षांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारताच त्यांच्या मागून एकच आवाज झाला ‘हा मराठीमेही बोलेंगे ओ...’
Mar 1, 2013, 07:21 PM ISTजर साहेबांच्या गाडीवर दगड पडला असेल तर- शर्मिला ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील सुरू असणारी शाब्दिक चकमक आणि त्यामुळे महाराष्ट्रभर त्याचे उमटणारे पडसाद यांच्या महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार ह्याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
Feb 28, 2013, 10:34 AM ISTसुप्रियाताईंचा राज ठाकरेंना टोला
जो माणूस काम करतो, त्याच्यावरच टीका होते. जो काम करत नाही त्याच्यावर टीका होत नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
Feb 15, 2013, 10:52 AM ISTसुप्रिया सुळेंची धावपळ... तीसुद्धा राज ठाकरेंसाठी?
`ओ हॅलो.. हॅलो... हॅलो तुमच्या सिक्युरिटीला जरा मागे करून निघाले....` असं म्हणत सुप्रिया सुळे या राज ठाकरेंसाठी धावपळ करत पढे आल्याचे या शाही लग्नात दिसून आलं.
Dec 8, 2012, 05:10 PM IST`दादा उठ की रं....` - सुप्रिया सुळे
`मी कुठं जातेयं... इथचं आहे.... माझे फोटो-बिटो झालं काढून... तू कुठे चाललास? थांब इकडं.. फोटो काढू..` असं म्हणत सुप्रिया सुळे, अभिजीत पवार आणि सदानंद सुळे फोटो काढण्यासाठी तयार झाले.
Dec 7, 2012, 10:10 PM IST...तर महिला मंत्रालयावर करंजा तळतील - सुप्रिया सुळे
“अनुदानित सिलेंडरची संख्या दिवाळीपुर्वी वाढवली नाही, तर महिला मंत्रालयावर करंजा तळायला जातील मुख्यामंत्र्यांनी असं होऊ नये याची काळजी घ्यावी” असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
Nov 6, 2012, 10:54 PM ISTखासदार सुप्रिया सुळे मारणार कानफाडात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापाठोपाठ त्यांची बहीण सुप्रिया सुळेंचीही ताईगिरी पाहायला मिळाली.. निमित्त होतं राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्याच्या समारोपाचं. यापुढे युवतींनो थप्पड मारायला सज्ज राहा. दुसरी थप्पड ही राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, असा दम सुप्रिया सुळे यांनी भरलाय.
Oct 28, 2012, 08:14 PM ISTसुप्रियाताईंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची एंट्री!
हिंजवडी म्हणजे पुण्याचा मानबिंदू.. भारतातलं आघाडीच आय टी हब. पण या आय टी हबला अनेक समस्यांनी ग्रासलंय. या भागाकडे सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष दिलंय. अनेकदा या भागाला भेटी देत त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण आता हे प्रश्न सोडवण्यासाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच कंबर कसलीय.
Oct 16, 2012, 06:30 PM IST