24taas

स्वतंत्र विदर्भाला मनसेचा विरोधच – राज ठाकरे

 वेगळ्या विदर्भाची मागणी ही काही व्यक्तींच्या राजकीय सत्तासुखासाठीची आहे. जिजाऊचा जन्म विदर्भाच्या मातीतला. त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला तोडण्याचे पाप कदापीही करू देणार नाही, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केलीय. 

Oct 1, 2014, 06:25 PM IST

सफरचंद खा! लठ्ठपणाला करा बाय बाय!

आपल्याला आरोग्यपूर्ण जीवनशैली हवी असेल तर दररोज एक सफरचंद खाणं सुरू करा. सफरचंदातील विशेष तत्वामुळं लठ्ठपणा संबंधित आजार दूर राहतात. वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावलाय. ग्रॅनी स्मिथ जातीच्या सफरचंदामध्ये नॉन डायजेस्टर घटक भरपूर मात्रेत असतात. 

Oct 1, 2014, 04:59 PM IST

UPDATE: या 'बंडोबां'चे आज झाले 'थंडोबा'!

इच्छुक पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागलाय. अनेक उमेदवारांनी बंडाचं शस्त्र उपसलंय. मात्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं बंडखोरांना शांत करण्याचा नेतेमंडळी चांगलाच प्रयत्न करतांना दिसतायेत. अनेक बंडोबांचा आता त्यामुळं थंडोबा झालाय. 

Oct 1, 2014, 04:22 PM IST

ऊर्जा, संरक्षण विषयात भारत-अमेरिका दोन्ही देशात करार

भारतातील इलाहाबाद, अजमेर, विशाखापट्टणम या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारत-अमेरिका या दोन देशांत अनेक महत्वाच्या विषयावर शिखर परिषदेमध्ये चर्चा झाली असून अनेक महत्वाचे करार करण्यात येणार आहेत. 

Sep 30, 2014, 11:48 PM IST

‘सर’ तुम्ही असे का गेलात!

आज संध्याकाळी नेहमीप्रमाणे बाबांचा फोन आला. पण तो फोन आज अतिशय दु:खाची बातमी सांगण्यासाठी होता. ज्यांनी आमचं आयुष्य घडवलं... आम्हाला संस्कार दिले ते आमचे सर... योगेश कुलकर्णी... त्यांनी आज या जगाचा निरोप घेतला... अवघ्या चाळीशीतल्या माझ्या सरांचं आज निधन झालं... या फोननंतर काही काळ तर मी सुन्नच झाले आणि जुन्या आठवणींनी टचकन डोळ्यात पाणी आलं.

Sep 30, 2014, 09:57 PM IST

काँग्रेसमुळं आघाडी तुटली नाही- सोनिया गांधी

काँग्रेसमुळं आघाडी तुटलेली नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलंय. माझ्यामुळं किंवा राहुल गांधींमुळं आघाडी तुटलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

Sep 30, 2014, 09:36 PM IST

काटोलचे अपक्ष उमेदवार प्रमोद चाफळे यांच्यावर गोळीबार

निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर चिखलफेक करणं आपल्याला माहित आहे. पण नागपूरच्या काटोल मतदारसंघात एका अपक्ष उमेदवारावर गोळीबार झाला आहे. प्रमोद चाफळे असं या उमेदवाराचं नाव असून गोळीबारात चाफळे थोडक्यात बचावले आहेत.

Sep 30, 2014, 09:01 PM IST

विनोद तावडेंनी निवडला सुरक्षित मतदारसंघ

भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते विनोद तावडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. समोर तुल्यबळ उमेदवार नसल्यानं ही लढत त्यांच्यासाठी सोपी असली तरी विरोधकांकडून मात्र मतदारसंघाबाहेरचा उमेदवार म्हणून मुद्दा उपस्थित केला जातोय. 

Sep 30, 2014, 08:45 PM IST