andheri

अंधेरीत ८ मजली व्यावसायिक इमारतीला आग

अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरातील एका आठमजली इमारतीला आज सकाळी आग लागली. कनकिया या व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. 

Mar 25, 2015, 12:41 PM IST

भोजपुरी चित्रपटाचा सुपरस्टार पवन सिंहच्या पत्नीची आत्महत्या

भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंह याची पत्नी नीलम सिंहने आज आत्महत्या केलीय. २१ वर्षीय नीलमचं तीन महिन्यांपूर्वी पवनसोबत लग्न झालं होतं. नीलमच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप पोलिसांना कळलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी कोणतंही सुसाइड नोट सापडलं नाही. 

Mar 8, 2015, 08:09 PM IST

बाप्पाचे चक्क आता सिक्स पॅक अॅब!

तुंदिलतनू गणपती बाप्पानंही आता चक्क सिक्स पॅक अॅब बनवलेत. अंधेरी येथील एका मंडळानं यंदा सिक्स पॅक अॅब असलेला गणपती बसवलाय. केवळ गणपतीच नव्हे, तर गणपतीची पूजाअर्चा करणारा इथला पुजारीही सिक्स पॅक अॅबवाला आहे. 

Sep 3, 2014, 10:17 PM IST

नितीन यांचं नविन घर सजवायचं राहून गेलं

अंधेरीत लोटस पार्कची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना अग्निशमन दलाचा एक जवान शहीद झालाय. नितीन इवलेकर असं त्यांच नाव असून ते बोरिवली फायर स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:चं घर घेतलं. त्या घरात ते राहायलाही गेले. मात्र, घर सजवायची इच्छा अधुरीच राहिली.

Jul 19, 2014, 08:36 AM IST

'लोटस पार्क'च्या आगीत अडकलेल्या जवानांची सुटका

अंधेरीत लोटस पार्कमध्ये लागलेल्या आगीवर अखेर सात तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. आगीमध्ये एका जवानाचा मृत्यू झालाय तर १० जण जखमी झालेत. जखमींना कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.  

Jul 18, 2014, 08:06 PM IST

मदत वेळेवर न पोहचल्याने आग विझवताना जवानाचा मृत्यू

अंधेरीतील लिंक रोड येथील लोटस बिझनेस पार्क इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना कर्तव्यावर असणाऱ्या एका जवानाचा मृत्यू झाला.  

Jul 18, 2014, 03:57 PM IST

मुंबई `मेट्रोसिटी` झाली हो, चला प्रवास करूया मेट्रोचा

`गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया`, असा विघ्नहर्त्याचा गजर सकाळी १०च्या मुहूर्तावर वर्सोवा स्टेशनात झाला आणि पुढच्या काही मिनिटांतच पहिली मेट्रो घाटकोपरच्या दिशेनं सुटली.

Jun 8, 2014, 11:17 AM IST