asha bhosle

हॅपी बर्थ डे आशाताई!

सूर सम्राज्ञी आशा भोसले यांचा आज वाढदिवस आहे. आशा भोसले आज ८१ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. आशा यांच्या जन्म ८ सप्टेंबर १९३३ साली सांगलीत झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९४३ साली केली.

Sep 8, 2013, 01:06 PM IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला आशा भोसले धावल्या

प्रसिध्द पार्श्वगायिका आशा भोसले यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. त्यांनी आर्थिक मदत केली आहे. आज आशा भोसले यांनी पाच लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केलाय.

Apr 24, 2013, 08:00 PM IST

‘माई’ - भावनाप्रधान पण रटाळ

‘माई’ हा बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. ज्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर पहिला आहे त्यांना कथेची नक्कीच कल्पना असेल. अल्झायमर या विकाराने ग्रस्त असलेल्या एका गरीब आईची कथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, या चित्रपट विषय याआधी आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा चित्रपट विचार करायला भाग पाडत नाही.

Feb 2, 2013, 06:02 PM IST

आशाताईंनी सचिनला दिली अनोखी भेट

क्रिकेटचा बादशहा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अनोखी भेट दिली आणि सचिन भलताच खूश झाला. यावेळी आशाताईंनी सचिनचे खूप कौतुक केले.

Jan 23, 2013, 12:18 PM IST

पाक कलाकारांचे स्वागत नको - आशा भोसले

आगामी काळात पाकिस्तानी कलाकारांचे भारतात स्वागत करता येणार नाही अशी भूमिका ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतलीय. दोन भारतीय जवानांची पाकिस्तानी सैन्याने निघृण हत्या केल्याने संतापलेल्या आशाताईंनी ही भूमिका घेतलीय.

Jan 21, 2013, 08:43 AM IST

वर्षा भोसलेंनी वापरलेले पिस्तुल आशाताईंचे

वर्षा भोसले यांनी आत्महत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तुल हे आशा भोसलेंचे हरवलेले पिस्तुल होते, स्वतः आशाताईंनी ही शक्यता वर्तविली आहे. पोलिसांनी आशा भोसले यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले. त्यात त्यांनी ही शक्यता वर्तविली.

Oct 10, 2012, 04:06 PM IST

वर्षा भोसलेंनी केला होता तीनदा आत्महत्येचा प्रयत्न

वर्षा यांनी या आधी तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १९९८ साली पती हेमंत केंकरे यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर वर्षा यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर २००८ सालीदेखील त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच यापूर्वी शेवटचा २०१०मध्येही असा प्रयत्न केला होता.

Oct 9, 2012, 07:27 PM IST

वर्षा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची कन्या वर्षा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री उशिरा मरीन लाईन्स इथल्या विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Oct 9, 2012, 10:42 AM IST

आशाताईंच्या मुलीची गोळी झाडून आत्महत्या

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंची कन्या वर्षा भोसलेनं स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. नैराश्येनं ग्रासलेल्या वर्षा भोसले यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केला आहे, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Oct 8, 2012, 01:31 PM IST

मिले सूर मेरा-तुम्हारा....

‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे...’ अक्षरशः असंच चित्र मंगेशकर कुटुंबाच्या घरगुती गणपती विसर्जनच्यावेळी काल आम्हाला पाहायला मिळालं. ढोल-ताशाचा नजरा, बाप्पासाठी खास केलेली फुलांची सजावट, फेटे बांधलेल्या मंगेशकर कुटुंबाचा थाट, आणि यासगळ्यामध्ये सगळ्यांसाठी सुखद धक्का म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले यांचं एकत्र घडलेलं दर्शन...

Sep 30, 2012, 03:46 PM IST

पाक कलाकारांना का गोंजारायचं?- राज

ज्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना परत जावं लागेल, तेव्हा त्यांना लाज वाटेल. दुसऱ्या देशात अशी वागणूक मिळाल्यावर ते आपल्या सरकारवर दबाव आणतील, की दहशतवाद थांबवा, कारण त्यामुळे दुसऱ्या देशांत आमची लाज जाते. त्यावेळी पाकिस्तानी सरकार दहशतवाद थांबवेल.

Sep 2, 2012, 02:20 PM IST

राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडली

रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत खुमासदार भाषण केलं.

Sep 2, 2012, 01:54 PM IST

पाक स्पर्धकांच्या ‘सूरक्षेत्र’ला मनसेचा विरोध

‘सूर क्षेत्र’ या टीव्ही शोला पुन्हा एकदा वादाला सामोर जावं लागणार आहे. या शोमध्ये आठ भारतीय आणि आठ पाकिस्तानी गायकांमध्ये जुगलबंदी रंगणार आहे.

Aug 30, 2012, 01:52 PM IST

आशाताई 'जज'च्या भूमिकेत...

इंडियन आयडॉल – ६ मध्ये अनु मलिक, सुनिधी चौहान आणि सलीम मर्चंट यांच्यासोबत संगीतक्षेत्रातली आणखी एक हस्ती आपल्याला सेटवर पाहायला मिळेल. ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द आशा भोसले आपल्याला ‘जज’च्या भूमिकेत दिसतील.

May 30, 2012, 12:03 PM IST

आशा भोसले गिनिजमध्ये

ज्यांच्या आवाजाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात, अशा सर्वांच्या लाडक्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाची नोंद आता गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय.

Nov 5, 2011, 01:25 PM IST