पाक स्पर्धकांच्या ‘सूरक्षेत्र’ला मनसेचा विरोध

‘सूर क्षेत्र’ या टीव्ही शोला पुन्हा एकदा वादाला सामोर जावं लागणार आहे. या शोमध्ये आठ भारतीय आणि आठ पाकिस्तानी गायकांमध्ये जुगलबंदी रंगणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 30, 2012, 02:48 PM IST

www.24taas.com, मुंबई
पाकिस्तानी गायक आणि स्पर्धकांचा सहभाग असलेल्या सूरक्षेत्रला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. तसेच या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी परिक्षक म्हणून सहभागी होऊ नये, अशी विनंती मनसेतर्फे करण्यात आली आहे.
सहारा वन वरील ‘सूर क्षेत्र’ हा भारत आणि पाकिस्तानच्या स्पर्धकांना घेऊन एक टीव्ही शो येत्या ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यावर आता वाद निर्माण झाला आहे. या शोमध्ये आठ भारतीय आणि आठ पाकिस्तानी गायकांमध्ये जुगलबंदी रंगणार आहे.

विशेष म्हणजे या शोमध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसलेही परीक्षक म्हणून सहभागी होणारेत. हा शो भारत आणि पाकिस्तानात एकाच वेळेस प्रक्षेपित होणार आहे. येत्या आठ सष्टेंबरपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. याला मनसेचा विरोध आहे. ‘हा कार्यक्रम होऊ नये अन्यथा याविरोधात आंदोलन छेडत कार्यक्रम बंद पाडू’ असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलाय.

‘सूर क्षेत्र’ या कार्यक्रमात भारताचं प्रतिनिधीत्व संगीतकार हिमेश रेशमिया करणार आहे. तर पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करत आहेत आतीफ अस्लम...
मात्र, कार्यक्रमातील पाकिस्तानी कलाकरांच्या सहभागावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या शोला विरोध केलाय. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या कार्यक्रमाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.