ओबामानंतर नरेंद्र मोदी फेसबुकवरील दुसरे सर्वात प्रसिद्ध नेते!
नरेंद्र मोदी हे भारतातच नाही परदेशामध्येही तितकेच प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर जगात कोणता नेता प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींच्या फेसबुक पेजचे लाईक्स आणि शेअरिंग बघता मोदी जगात दुसऱ्या नंबरवर आहेत.
May 21, 2014, 04:10 PM ISTओबामांच्या हत्येचा कट रचणाऱ्याला फाशीची शिक्षा
अमेरिकेत न्यायमूर्तींनी अखेर एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
May 14, 2014, 08:47 PM ISTभारतीय नव्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक - ओबामा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही नव्या सरकारचे वेध लागले आहेत. भारताच्या नव्या लोकनियुक्त सरकारसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं ओबामांनी म्हटलयं.
May 13, 2014, 02:49 PM ISTओबामांच्या मुलींचा पाठलाग करणारा जेरबंद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मुलींना घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग केला गेल्यानंतर व्हाइट हाऊस सध्या बंद करण्यात आलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अति सुरक्षा असलेल्या परिसरात अधिकाऱ्यांनी पाठलाग करण्याऱ्या कारला रोखलं आणि कार चालकाला ताब्यात घेतलं.
May 7, 2014, 06:07 PM IST`क्रिमिया`ला स्वतंत्र देश म्हणून रशियाची मान्यता
शीतयुद्धानंतर मॉस्कोविरुद्ध लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधांवर टीका करत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनच्या `क्रिमिया` या भागाला `स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण देश` म्हणून मान्यता दिलीय.
Mar 18, 2014, 09:51 AM ISTबराक ओबामा- बेयोंसची दुसरी प्रेम कहाणी चर्चेत
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि प्रसिद्ध पॉप गायिका बेयोंस नोल्ज यांच्यामधील प्रेमकहाणीची जोरदार सुरू असल्याचे वृत्त एका फ्रेंच वृत्तपत्राने दिल्याने अमेरिकेत चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, बराक यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर मिशेल घटस्फोट घेणार आहे, असेही वृत्त आहे. पहिले वृत्त यूरोप -1 रेडियोने प्रसारित केले.
Feb 12, 2014, 07:40 AM ISTजेव्हा ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकतात?
ऐकलंत का... "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा नमो-नमो करतायेत", खाली असलेल्या बनावटी फोटोचं हे कॅप्शन आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. यात बराक ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत आहेत, असं दिसतंय.
Feb 5, 2014, 01:44 PM ISTइस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचं निधन
द किंग ऑफ इस्रायल`, `द लायन ऑफ गॉड` या बिरुदावल्या मिरवणारे इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचे शनिवारी निधन झालं ते ८५ वर्षांचे होते. २००६ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आठ वर्षांपासून ते कोमात गेले होते.
Jan 12, 2014, 10:46 AM ISTबराक ओबामांच्या आयफोन वापरण्यावर बंदी!
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरू दिला जात नसल्याचं स्पष्ट झालंय. व्हाईट हाऊसमध्ये युवकांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ओबामा बोलत होते. त्यावेळी त्यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरण्यास बंदी असल्याचं म्हटलं.
Dec 5, 2013, 02:56 PM ISTमुंबई हल्ल्याबाबत बराक ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडणी
अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानऊघडणी केली आहे.
Oct 24, 2013, 02:49 PM ISTशांततेच्या नोबेलसाठी व्लादिमिर पुतिन यांचं नामांकन
सीरियावरील हल्ला ज्यांनी आपल्या मध्यस्थीनं रोखला, ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नावाचं यंदाच्या शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन केलंय.
Oct 3, 2013, 08:10 AM ISTमनमोहन-शरीफ भेटणार, पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर!
पंतप्रधान मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी अमेरिका दौऱ्यावर रवाना झालेत. आज ते वॉशिंग्टनमध्ये पोहोचतील. त्यानंतर शुक्रवारी ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्य़क्ष ओबामा यांच्या भेटीत अनेक प्रादेशिक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Sep 26, 2013, 09:13 AM ISTमोदींनी तोडला ओबामांचा रेकॉर्ड!
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेद्वार म्हणून घोषित करण्यात आलेले नरेंद्र मोदी गुगलवरील सर्वाधिक लोकप्रिय नेता ठरलेत.
Sep 15, 2013, 09:44 AM ISTसीरियावर हल्ला करणं गरजेचं- ओबामा
अमेरिका सीरियावर हल्ला करणं गरजेचं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलंय. निरपराध लोकांवर रासायनिक अस्त्रांचा वापर करून सीरियानं आंतरराष्ट्रीय कायदा मोडला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Sep 11, 2013, 08:50 AM ISTसीरियावर हल्ल्याचा अद्याप निर्णय नाही - ओबामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा सीरियावर हल्ला करण्याचा मूड आता बदललाय. सीरिया सरकारनं २१ ऑगस्ट रोजी आपल्याच जनतेवर केलेल्या कथित रासायनिक हल्ल्याचा परिणाम म्हणून दमिश्कवर हल्ला करण्याबद्दल आपण आत्तापर्यंत काहीही निर्णय घेतला नसल्याचं ओबामा यांनी म्हटलंय.
Aug 29, 2013, 03:19 PM IST