मोदी के मन की बात (भाग-२)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2014, 01:22 PM ISTकाळा पैसा भारतात परत आणणारच - मोदी
विदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे याचा नेमका आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हा काळा पैसा भारतातील गरीबांचा असून त्यातील पै न् पै परत आणू असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
Nov 2, 2014, 12:31 PM ISTमोदी झाले भाजपाचे पहिले ऑनलाइन सदस्य
भाजपानं देशव्यापी सदस्य नोंदणीस शनिवारपासून सुरुवात केली. या सदस्य नोंदणीसाठी पक्षानं एक टोलफ्री टेलीफोन नंबर सुरू केला आहे. पक्ष मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेवेचं उद्घाटन केलं आणि हातातील स्मार्टफोनवरून लगेच त्या नंबरवर फोन करून पक्षाचं पहिलं ऑनलाइन सदस्यत्वही घेतलं.
Nov 2, 2014, 10:18 AM ISTविरोधी पक्षात बसायची शिवसेनेची तयारी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 08:45 PM ISTशिवसेना विरोधात बसणार, शपथविधीला उद्धव जाणार नाहीत
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या उद्या होणाऱ्या शपथविधीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. शिवसेनेनं विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुरू केल्याचं समजतंय.
Oct 30, 2014, 04:43 PM ISTमुख्यमंत्री वानखेडे स्टेडियमवर ३० ऑक्टोबरला शपथ घेण्याची शक्यता
भाजपकडून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. भाजपनं दोन दिवसांसाठी वानखेडे स्टेडियम बुक केलंय. २९ आणि ३० ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी वानखेडेचं बुकिंग करण्यात आलंय. वानखेडेवरच नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
Oct 26, 2014, 10:09 PM ISTहरयाणात भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसचं पानिपत!
महाराष्ट्रासोबतच आज हरयाणात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. इथं भाजपचा भगवा फडकण्याची चिन्हं आहेत. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांपैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी असून भाजपला पूर्ण बहुमत मिळालंय. देशातील सत्ता गमावल्यामुळं राजकीयदृष्ट्या कोमात गेलेल्या काँग्रेसला हा जबरदस्त मोठा धक्का मानला जात आहे.
Oct 19, 2014, 07:35 PM ISTदेशात मोदींची लाट कायम, दोन्ही राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच - शाह
दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेलं यश हे भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे. देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी उभी राहिली असून पाठिंब्याबद्दल जनतेचे विशेष आभार मानत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट कायम असल्याचं म्हटलंय.
Oct 19, 2014, 05:40 PM ISTजनतेनं नाकारलं, मनसेचा फुसका बार, दिग्गज गडगडले!
विधानसभा निवडणुकीत तिखट शब्दात विरोधकांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेनं लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही सपाटून मार खाल्ला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांसह विधानसभेची पायरी चढणाऱ्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलंय. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे या नेत्यांचा यंदा दारुण पराभव झाला आहे.
Oct 19, 2014, 05:05 PM ISTदिवाळी कोणाची? सरकार कोणाचं, थोड्याच वेळात निकाल
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळं राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे, हे अवघ्या काही तासांनंतर कळणार असल्यामुळं निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
Oct 19, 2014, 06:32 AM ISTगडकरींच्या ‘लक्ष्मीला नाकारू नका’ वक्तव्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीय. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवलाय. बुधवार संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं गडकरींना दिले आहेत.
Oct 7, 2014, 07:07 AM IST'तेव्हा' बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठं गेला? - उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठं गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
Oct 6, 2014, 12:03 PM ISTघटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
Sep 24, 2014, 11:52 PM ISTघटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
Sep 24, 2014, 11:42 PM IST