विरोधीपदासाठी काँग्रेस तर शिवीगाळ प्रकरणी तृणमूल आक्रमक
काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केलीय. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली.
Jul 9, 2014, 12:03 PM ISTदिवसाढवळ्या भाजप नेत्याची क्रूर हत्या
उत्तरप्रदेशनच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात दोन अज्ञात हल्लेखोरांनी आज एका स्थानिक भाजप नेत्याची क्रूर हत्या केलीय.
Jun 10, 2014, 06:42 PM ISTपहिल्याच दिवशी लोकसभा अधिवेशन स्थगित
सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. परंतु, आज सभागृहात कोणतंही कामकाज होणार नाही.
Jun 4, 2014, 10:13 AM ISTलोकनेते गोपीनाथ मुंडे अनंतात विलीन
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आज बीड जिल्ह्यातील परळीतल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाण्यांच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Jun 4, 2014, 07:42 AM ISTमोदी सरकारचं संसदेचं पहिलं अधिवेशन 4 जूनपासून
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं संसदेतील पहिलं विशेष अधिवेशन हे येत्या ४ जूनपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ११ जूनपर्यंत चालेल. ४ आणि ५ जूनला खासदरांचा शपथविधी होईल. तर जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती, संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली.
May 29, 2014, 02:27 PM ISTनरेंद्र मोदी काशीचेच खासदार, बडोद्याची जागा सोडली!
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता वाराणसीचेच खासदार राहणार आहेत. त्यांनी गुजरातच्या बडोद्याची जागी सोडलीय. मोदी वाराणसी आणि बडोदा दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते. आता पुढील पाच वर्षे लोकसभेत ते वाराणसीचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
May 29, 2014, 01:18 PM ISTअखेर नाराज गितेंनी स्वीकारला पदभार!
शिवसेनेचे नाराज मंत्री अनंत गिते यांनी अखेर आज आपल्या अजवड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले तरी शिवसेनेला एकच मंत्रीपद ते ही मोठं नाही, त्यामुळं शिवसेना आणि उद्धव ठाकरे नाराज झाले होते.
May 28, 2014, 12:42 PM ISTमोदींच्या कॅबिनेटचा पहिला दणका, काळ्या पैशाच्या चौकशीसाठी SIT!
आज सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर संध्याकाळी मोदींच्या कॅबिनेटनं एक दणका देणारा निर्णय घेतलाय. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.
May 27, 2014, 08:27 PM ISTशरीफ यांना राष्ट्रगीतासाठी उभे राहावे लागले
भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच सर्वांबरोबरच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उभे राहिले. भारताच्या राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहावे लागू नये म्हणून त्या-त्या कार्यक्रमाच्या वेळी अनुपस्थित राहणे किंवा उशिरा येण्याचा मार्ग अवलंबणार्यान शरीफ यांना यावेळी मात्र उभे राहावे लागले.
May 27, 2014, 12:57 PM ISTमोदींनी शपथ घेताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!
नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबा यांनीही वडनगरमध्ये घरात बसून नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पाहिला. हिराबा यांच्यासोबत मोदींचे सर्व कुटुंबियही उपस्थित होते. मोदींचे भाऊ पंकज यांच्या डोळ्यात याक्षणी आनंदाश्रू तरळले.
May 26, 2014, 10:48 PM ISTनरेंद्र मोदींचे कॅबिनेटः ४५ मंत्री घेणार शपथ
भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी शपथ घेणार आहे. पण त्यापूर्वी दिल्लीतील गुजरात भवन येथे भाजप नेत्यांच्या भविष्यातील कॅबिनेट संदर्भात तणावात बैठक झाली.
May 26, 2014, 02:02 PM ISTसोनिया, राहुल गांधीही मोदींच्या शपथविधीला राहणार हजर
नरेंद्र मोदींच्या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. सोमवारी म्हणजेच 26 मेला संध्याकाळी सहा वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही निमंत्रित करण्यात आलं होतं.
May 24, 2014, 05:01 PM ISTनवाझ शरीफांच्या भारतभेटीवर त्यांची मुलगी म्हणते...
नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणा-या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येणार असल्याचं नक्की झालंय.
May 24, 2014, 03:08 PM ISTगुडबाय गुजरात: निरोप समारंभात भावुक झाले मोदी
गुजरात विधानसभेत बुधवारी विद्यमान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सेंडऑफ देण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले. मोदी 26 मे रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. मोदी बुधवारी सकाळी गुजरात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पोहचले.
May 21, 2014, 03:09 PM ISTअडवाणी लोकसभा अध्यक्ष तर राजनाथ मोदींच्या कॅबिनेटमध्ये?
नव्या सरकार स्थापनेसाठी दिल्लीत घडामोडींना सुरुवात झालीय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. या दोघांमध्ये कॅबिनेट संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.
May 18, 2014, 02:47 PM IST