www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात झाली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी दोन मिनिटांचं मौन बाळगल्यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं. त्यामुळे, आज सभागृहात कामकाजाला सुरुवात झाली नाही.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आज सभागृहात होणाऱ्या खासदारांच्या शपथग्रहण कार्यक्रमालाही पुढे ढकलण्यात आलंय. आता नवे संसद सदस्य 5 जून आणि 6 जून रोजी शपथ ग्रहण करतील. आजपासून सुरु होणाऱ्या संसद सत्रात 6 जून रोजी सभापतींची निवड होईल. 9 जून रोजी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित करतील आणि 10-11 जून रोजी धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होईल आणि त्याच दिवशी सत्र समाप्त होईल.
बुधवारी संसदेतील सत्राची कामकाज स्थिगित झाल्यनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11.30 वाजता संसद भवन परिसरातच कॅबिनेट बैठक आयोजित केलीय. काँग्रेसच्यावतीन मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम पाहतील. लोकसभेत मात्र विरोधी पक्षाच्या बाबतीत अजून कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.