www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं संसदेतील पहिलं विशेष अधिवेशन हे येत्या ४ जूनपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ११ जूनपर्यंत चालेल. ४ आणि ५ जूनला खासदरांचा शपथविधी होईल. तर जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती, संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली.
अधिवेशनात नऊ तारखेला राष्ट्रपतींचं संयुक्त सभागृहात अभिभाषण होईल आणि त्याच दिवसापासून लोकसभेबरोबरच राज्यसभेचंही कामकाज सुरू होईल, अशी माहिती नायडू यांनी दिली. काँग्रेस नेते कमलनाथ हे प्रभारी सभापती असतील, त्यांच्या नावाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्याचं नायडूंनी सांगितलं. कलमानथ हे नव्या खासदारांना सदस्यत्वाची शपथ देतील.
दरम्यान, देशाची विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विशेष दशसूत्री कार्यक्रम आणि प्राधान्य धोरणही जाहीर केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दशसूत्री कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली. या दशसूत्री कार्यक्रमाच्या आधारे पहिल्या 100 दिवसांमध्ये प्रत्येक मंत्रालयानं आपापली धोरणं निश्चित करावी, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.