<B> <font color=red>नरेंद्र मोदी:</font></b> जनतेचे आभार, त्यांनी एका चहावाल्याला मुख्यमंत्री केलं
नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर आज भारत स्वाभिमान ट्रस्टच्या स्थापना दिवसाच्या कार्य़क्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात योगगुरु रामदेवबाबांसोबत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका करत जनतेचे आभारही मानले आहेत.
Jan 5, 2014, 07:16 PM ISTशिवरायांनी सुरतला नाही, औरंगजेबाला लुटलं- नरेंद्र मोदी
काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केल्याची घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली. रायगड किल्ल्यावर शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे आजचं नरेंद्र मोदींचं भाषण अराजकीय होतं. शिवप्रतिष्ठान संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तब्बल १५ हजारांहून अधिक शिवप्रेमींना गर्दी केली होती.
Jan 5, 2014, 06:20 PM ISTअरविंद केजरीवालांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलंय. एकूण ३७ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव ‘आप’ सरकारनं जिंकला. विधानसभेत याबाबत मतदान पार पडलं.
Jan 2, 2014, 06:59 PM ISTझी न्यूजचं सर्वात मोठं स्टिंग - ऑपरेशन सरकार
काँग्रेसच्या आमदारांनी समर्थन देण्यासाठी मागितले पैसे... पाहा सर्वात मोठा खुलासा...
Dec 27, 2013, 08:11 PM ISTसरकार चालवणं म्हणजे चंद्रावर जाण्यासारखं नाही- केजरीवाल
तेरा दिवसांपासून सरकारविना असलेल्या दिल्लीत आता सरकार स्थापनेचे संकेत मिळू लागलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार स्थापनेचे निर्देश देण्यात आलेत. दुसरीकडे `आप`च्या उत्तरासाठी दोन दिवस राहिलेत. याविषयी आपनं दिल्लीकरांकडे एसएमएसच्या माध्यमातून प्रतिक्रिया मागितल्या आहेत.
Dec 21, 2013, 02:04 PM ISTजेलबाहेर पडताच लालू म्हणाले ‘जेल तो कृष्ण की जन्मभूमि है’!
चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार लालू प्रसाद यादव अवघ्या तीन महिन्यांतच जेलबाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यामुळं लालूंची आज बिरसा मुंडा जेलमधून सुटका झाली.
Dec 16, 2013, 04:42 PM ISTमोदींचा रामदेवबाबांना पाठिंबा, काँग्रेसवर टीका
`काँग्रेसचं सरकार योगगुरू रामदेव बाबांच्या मागं हात धुवून लागलं आहे. रोजच्या रोज त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलाय. शिवाय `रामदेवबाबांना अडकवण्यासाठी काँग्रेस जी ताकद लावतेय, ती ताकद त्यांनी उत्तराखंडातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी लावली असती तर त्यांचं भलं झालं असतं,` अशी तोफही मोदींनी डागली.
Dec 15, 2013, 04:39 PM ISTपेच दिल्लीच्या गादीचा: प्रशांत भूषण यांनी वक्तव्य फिरवलं
जनलोकपालच्या मुद्द्यावर भाजपने पाठींबा दिला तर दिल्लीत सरकार स्थापनेसाठी आम आदमी पार्टी भाजपला पाठींबा देईल, या प्रशांत भूषण यांच्या विधानावर खळबळ माजली होती. मात्र या प्रशांत भूषण यांनी आज हे विधान फेटाळलंय.
Dec 10, 2013, 12:50 PM IST‘आप’ भाजपला काही अटींसह समर्थन देण्यास तयार- प्रशांत भूषण
दिल्लीत सत्ता कोण स्थापन करणार याला जणू ग्रहणच लागलंय. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीय, सरकार बनवण्यासाठी ३६ सीट्स गरजेच्या आहेत. अजूनही भाजप आणि आम आदमी पक्षानं आतापर्यंत सरकार बनविण्यासंदर्भात पुढं आले नाहीत.
Dec 10, 2013, 10:30 AM ISTदिल्लीवर सत्ता कोणाची? पेच वाढला, पुन्हा निवडणूक?
दिल्लीतला राजकीय पेच वाढतच चाललाय... सत्ता स्थापन करण्यासाठी कुठल्याही परिस्थिती काँग्रेस किंवा भाजपची मदत घेणार नसल्याचं आम आदमी पार्टीनं स्पष्ट केलंय. दिल्लीनं आम आदमी पार्टीला विरोधात बसण्याचा कौल दिलाय. त्यामुळं आम्ही विरोधात बसू असंही पक्षाचं म्हणणंय. प्रसंगी पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारीही आम आदमी पार्टीनं दर्शवलीय.
Dec 9, 2013, 12:49 PM IST‘पहले आप, पहले आप’मध्ये सत्ता कोणाची?
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीमुळं काँग्रेसचा पुरता सफाया झाला... आम आदमी पार्टीनं आपल्या पहिल्याच निवडणुकीत २८ जागा पटकावल्या... तर १५ वर्षांपूर्वी दिल्लीत सत्ता गमावलेल्या भाजपनं ३१ जागा मिळवल्या... मात्र एवढ्या जागा मिळवूनही भाजपला बहूमतासाठी आणखी ५ जागांची गरज आहे...
Dec 9, 2013, 09:45 AM ISTपक्षाला आत्मचिंतनाची गरज, सोनियांची कबुली
विधानसभा निवडणुकीतला पराभव मान्य करत पक्षाला आत्मचिंतनाची गरज असल्याचं मत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं.
Dec 9, 2013, 08:10 AM IST.. मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर!
दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपचा `झाडू`च कारणीभूत ठरला... आम आदमीच्या या घवघवीत यशाचा सूत्रधार होता एक आयआयटीचा मॅकेनिकल इंजिनिअर... अरविंद केजरीवाल...
Dec 8, 2013, 10:40 PM IST‘आप’च्या धक्क्यानं शीला दीक्षितांचा राजीनामा!
चार राज्यांच्या मतमोजणीद्वारे धक्कादायक निकाल पुढे आले आहेत. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीत जोरदार मुसंडी मारलीय. आपच्या झाडूनं काँग्रेसचा जणू सफायाच केलाय. त्यामुळं आपला पराभव स्वीकारत दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी राजीनामा दिलाय.
Dec 8, 2013, 12:07 PM ISTमोदींची ‘ललकार’, सरकारला धरलं धारेवर!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारवर हल्लाबोल केलाय. सीमेवर भारतीय जवान शहीद होतायेत आणि सरकार झोपेत असल्याचं टीकास्त्र मोदींनी सोडलंय. जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेल्या ‘ललकार’ रॅलीत त्यांनी ही टीका केलीय.
Dec 1, 2013, 07:25 PM IST