विधानसभेवर भाजपचा ब्लॅक मार्च
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी केलीय. त्यासाठी गोंदिया आणि वर्ध्यातून रॅली काढण्यात आल्या. तर विधानसभा परिसरात भाजपच्या नेत्यांनी काळे झेंडे घेवून राज्यकर्त्यांचा निषेध केला. आज मंगळवारी नागपूर विधानसभेवर भाजप मोर्चा धडक देणार आहे.
Dec 11, 2012, 12:08 PM ISTयेडीयुरप्पांच्या नव्या पक्षाची आज घोषणा
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा आज औपचारिकपणे कर्नाटक जनता पार्टी या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं येडीयुरप्पा यांच्या समर्थकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारलाय.
Dec 9, 2012, 11:48 AM ISTअंतर्गत नाराजी भाजपसाठी त्रासदायक
गुजरातच्या सुरत शहरातली निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलीये. सर्वच्या सर्व म्हणजेच बाराही जागा जिंकण्याचं मोदींचं स्वप्न आहे. मात्र, भाजपमधली अंतर्गत नाराजी आणि सोबतच केशुभाई पटेलांची गुजरात परिवर्तन पार्टी भाजपसाठी त्रासदायक ठरणार आहे.
Dec 8, 2012, 11:42 AM ISTमाया-मुलायमुळे सरकार तरले, देशाच्या माथी FDI!
रिटेल क्षेत्रात एफडीआयच्या सरकारच्या निर्णयावर मतदान होण्यापूर्वीच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने लोकसभेतून वॉकऑऊट केल्यामुळे सरकार तरले आहे. समाजवादी पक्षाकडे २२ खासदार आहेत तर बसपकडे २१ खासदार आहेत.
Dec 5, 2012, 07:13 PM ISTसंसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे.एफडीआयच्या मुद्यावरुन युपीएचा घटक पक्ष तृणमुल काँग्रेसनं पाठिंबा काढल्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सरकार सामोरं जातंय. हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.
Nov 22, 2012, 09:21 AM ISTमा. गो. वैद्यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. गडकरीविरोधी कारस्थानाचे केंद्र गुजरातमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलयं.
Nov 12, 2012, 12:56 PM ISTगडकरी राजीनामा द्या – राम जेठमलानी
भाजप नेते राम जेठमलानींनी अपेक्षेप्रमाणे भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर तोफ डागलीय़. नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जेठमलानी यांनी केलीय.
Nov 6, 2012, 01:12 PM ISTसोनियांच्या जावयाने केले फेसबुक अकाऊंट बंद
रिअलिटी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या डीएलएलची कृपादृष्टी झाल्याच्या आरोपांवरून वादात अडकलेले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांनी आपले फेसबुक अकाउंट बंद केले आहे. फेसबुकवर त्यांनी भारताची तुलना बनाना रिपब्लिकशी केली होती.
Oct 8, 2012, 05:56 PM ISTसंघाकडून नीतिश राजची प्रशंसा, अडचणीत मोदी
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारांवरून एनडीएमध्ये खडाजंगी थांबण्याचे नाव घेतल नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणून त्यांची स्तुती करणारा संघ परिवार आता बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचे गोडवे गात आहे.
Aug 10, 2012, 03:12 PM IST