www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत सत्ता कोण स्थापन करणार याला जणू ग्रहणच लागलंय. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीय, सरकार बनवण्यासाठी ३६ सीट्स गरजेच्या आहेत. अजूनही भाजप आणि आम आदमी पक्षानं आतापर्यंत सरकार बनविण्यासंदर्भात पुढं आले नाहीत.
दोन्ही पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करायला तयार आहेत. मात्र जर भाजप आमच्या मागण्या पूर्ण करतील, तर काही अटींसह आम्ही दिल्लीत भाजपला सरकार बनविण्यास मदत करू, असं आता आम आदमी पक्षानं म्हटलंय. तर तिकडे भाजपनं १५ वर्षानंतर दिल्लीत सरकार स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज बैठक बोलावलीय.
मागील वर्षी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षानं आपलं मत स्पष्ट केलंय, की आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करु किंवा पुन्हा निवडणुकीला तयार असू... आपचे नेते मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल म्हणाले की काँग्रेस आणि भाजपसोबत जाण्यापेक्षा पुन्हा निवडणूक लढू. मात्र ‘आप’चे वरिष्ठ नेता प्रशांत भूषण यांनी काल भाजपची साथ देण्याची तयारी दर्शविली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूषण म्हणाले, आम आदमी पक्ष अटींसह भाजपला समर्थन द्यायचा विचार करु शकतो. मात्र भाजपनं २९ डिसेंबरपर्यंत जनलोकपाल विधेयक पास करुन द्यावं आणि जनसभेचं आयोजन करुन ‘आप’नं नागरिकांना जी आश्वासनं दिलीत, ते लेखी स्वरुपात लिहून द्यावं. हे आपलं वैयक्तीक मत असल्याचं प्रशांत भूषण यांनी सांगितलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.