central railway

मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. दिवा आणि मुंब्रा दरम्यान रूळाला तडे गेल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय. 

Sep 3, 2014, 12:41 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

मध्य रेल्वेची सकाळी विस्कळीत झालेली वाहतूक हळहळू पूर्वपदावर येत आहे. ही वाहतूक आता सुरळीत झाली आहे.

Sep 2, 2014, 12:40 PM IST

मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

संततधार पावसामुळे स्लो ट्रॅकवरची अपडाऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशीराने सुरू आहे. 

Sep 2, 2014, 08:06 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर सुरु

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर सुरु

Aug 22, 2014, 10:44 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर सुरु; पहिल्याचं दिवशी 'विघ्न'

कोकण रेल्वेच्या मार्गावर आज पहिली डबल डेकर ट्रेन धावली. मात्र, पहिल्याच दिवशी या ट्रेनसमोर समन्वयाच्या अभावाचं ‘विघ्न’ उभं राहिलं.  

Aug 22, 2014, 10:19 AM IST

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 20 प्रिमियम एसी डबल डेकर

गणेशोत्सवात कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वे गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि  करमाळी दरम्यान 20 प्रिमियम एसी डबल डेकर विशेष रेल्वे चालविण्यासाठी निर्णय घेतला आहे.

Aug 13, 2014, 04:18 PM IST

मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर सकाळी 9.45 ते दुपारी 3.15 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तर हार्बर लाईनवर सीएसटीहून पनवेल, बेलापूर आणि वाशीला जाणाऱ्या तसंच तेथून सीएसटीला निघणाऱ्या लोकल सकाळी 10.15 ते दुपारी 3वाजेपर्यंत धावणार नाहीत.

Jul 27, 2014, 09:10 AM IST

सेन्ट्रल रेल्वेवर तुमचा प्रवास होणार सुपरफास्ट

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता एक महत्त्वाची बातमी. सप्टेंबरपासून तुमचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

Jul 14, 2014, 11:54 PM IST

मुंबईत पाऊस सुरुच, मध्य रेल्वे उशिराने

 मुंबईत बुधवारपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली.

Jul 4, 2014, 10:26 AM IST

सीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग

मुंबईतील सीएसटी स्टेशनावरील मध्य रेल्वेच्या इमारतीच्या चौथ्या आणि मजल्यावर भीषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहे.

Jun 27, 2014, 06:10 PM IST

रेल्वे 'पास'! दरवाढीपूर्वीच रेल्वेनं केली 70 कोटींची कमाई

25 जूनपासून लोकल पासात दुप्पट अशी वाढ होणार असल्याच्या भीतीपोटी त्यापूर्वीच पास काढून मोकळ्या झालेल्या प्रवाशांनी रेल्वेला रेकॉर्ड ब्रेक कमाई करून दिली आहे. 24 जून हा पास घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं अनेक प्रवाशांनी पास काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. त्यामुळं याच दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेला मिळून 40 कोटी 71 लाख 99 हजार 200 रुपयांची कमाई करता आली. 

Jun 26, 2014, 10:12 AM IST

ट्रॅकवर झाडं कोसळलं, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Jun 10, 2014, 07:09 PM IST

मध्य रेल्वेची सेवा कोलमडली

वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडली. आज सकाळी साडेसातच्या सुमारास तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आणि ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबई आणि उपनगरी गाड्या उशिराने धावत होत्या. तर काही गाड्या एकाच जागेवर उभ्या होत्या. याचा फटका कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसला.

Apr 29, 2014, 10:56 AM IST

मध्य मार्ग आणि ठाणे- वाशी रेल्वेसेवा विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक दोनवेळा विस्कळीत झाली. सातत्याने मध्य मार्गावरील प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही मध्य रेल्वे काही बोध घेत नसल्याचे दिसून येत आहे. भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसला आहे. कळवा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड त्यानंतर अंबरनाथ येथे रेल्वे रूळाला तडे गेलेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, ठाणे - वाशी दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत होती. ती पूर्वत सुरू झाली आहे.

Dec 13, 2013, 12:33 PM IST