cid

शॉर्ट ब्रेकनंतर सीआयडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस

सोनी चॅनेलवरील प्रसिद्ध सीआयडी टीव्ही शो गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर दिसत नाहीये. त्यामुळे हा शो बंद झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र हा शो लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्टीकरण खुद्द सीआयडीमधील एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम यांनी दिलेय. 

May 26, 2016, 10:39 AM IST

अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

(अजित मांढरे, झी २४ तास) राज्यभरात गाजत असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्यात आल्याची माहिती, राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली आहे.

Oct 29, 2015, 06:41 PM IST

दरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार, सीआयडी चौकशीचे आदेश

नदिया जिल्ह्यातील गंगनापूर इथल्या कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Mar 15, 2015, 09:14 AM IST

CID बोलणार.. दया दरवाजा तोड गं...!

 गेली सोळा वर्षे 'सोनी वाहिनी'वरील 'सीआयडी' या मालिकेचे 'दया दरवाजा तोड दो' या संवादाचे महत्व अजून कायम आहे. पण लवकरच या संवादातील दयाची जागा जयवंती शिंदे ही मराठमोळी सीआयडी अधिकारी घेणार आहे. आपल्या टॉमबॉय लुकसाठी प्रसिद्ध असलेली तान्या अब्रोल सीआयडीमध्ये लवकरच 'लेडी दया'च्या भूमिकेत येणार आहे. दर आठवडय़ाला गुंतागुंतीचा गुन्हा आपल्या खास शैलीमध्ये सोडवण्यासाठी प्रसिद्ध आसलेल्या एसीपी प्रद्युम्नच्या गटामध्ये एका नवीन कायमस्वरूपी अधिकाऱ्याची भर पडणार आहे. जयवंती शिंदे नावाची ही मराठमोळी अधिकारी असली तरी, निर्भया आहे.

Nov 26, 2014, 07:33 PM IST

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या हातात बेड्या

कॉमेडी किंग कपिल शर्माला सीआयडीने अटक केली असे म्हटल्यावर तुम्हाला धक्का बसेल पण हे रिअल लाइफमध्ये नाही तर रील लाइफमध्ये झाले आहे. कौन बनेगा करोडपती शो मध्ये अशा प्रकारे शुटिंग करण्यात आली. 

Aug 12, 2014, 08:26 PM IST

कल्पना गिरी हत्याप्रकरणाचा तपास आता CID कडे

लातूरमधील काँग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी त्यासंदर्भात आदेश दिलाय. पोलीस महालसंचालकांनी तशी माहिती लातूर पोलिसांना दिली आहे.

May 10, 2014, 03:52 PM IST

नाट्य परिषदेत `सीआयडी`चा प्रयोग

अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणुकीतल्या बोगस मतपत्रिका प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी पुढे आली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात आपलं पॅनल उतरवणारे ज्येष्ठ रंगकर्मी विनय आपटे यांनी ही मागणी केली.

Feb 24, 2013, 11:21 PM IST

'रावडी राठोड'च्या मदतीला 'सीआयडी'

गाजलेल्या सीआयडीची मदत अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हालाही लागली. ‘रावडी राठोड’ सिनेमाचं प्रमोशन करायला अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा ‘सीआयडी’मध्ये आले होते. लवकरच हा भाग टीव्हीवर पाहायला मिळेल.

May 23, 2012, 11:43 AM IST

दारूने घेतला 'जीव' सरकारची फक्त 'चिव-चिव'

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात विषारी दारुमुळं १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत. याचा बाबतीत गुरवारी सात लोकांना अटक करण्यात आली आहे. या विषारी दारूमुळे आज तब्बल ४० लोकांनी आपला जीव गमावला आहे.

Dec 15, 2011, 10:21 AM IST