मुंबई : (अजित मांढरे, झी २४ तास) राज्यभरात गाजत असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्यात आल्याची माहिती, राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली आहे.
राज्यात या प्रकणावरून रान उठवलं जात असताना, पहिल्यांदा राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सीआयडी चौकशीच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधला आहे.
पोलिस दलाचं मनोबल कायम राखण्यासाठी, अशोक सादरे यांच्या आत्महत्येमागील कारण पुढे येणे पोलिसांसाठी येणे गरजेचं आहे.
अशोक सादरे यांच्या आत्महत्येमागे वाळूमाफिया सागर चौधरी आहे, तसेच त्याला राजकीय अभय असल्याचा आरोप अशोक सादरे यांच्या पत्नी माधुरी सादरे यांनी केला आहे.
या प्रकरणी जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, तसेच पोलिस निरीक्षक रायते यांच्यावरही आरोप आहेत. यामुळे पुरावे नष्ट होण्याची भीती सादरे यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.