ऑडिट - बीड (लोकसभा मतदारसंघाचं)
बीडमध्ये यावेळी विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणुकही होवू घातली आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे बीडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक 15 ऑक्टोबरलाच होतेय. याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा लेखाजोखा बीड जिल्ह्यातील मतदारसंघांचा.
Oct 7, 2014, 07:27 PM ISTऑडिट - पुणे (लोकसभा मतदारसंघाचं)
विद्यमान आमदारांना पुन्हा आमदारकी मिळणार का...? जनतेची कामे झालीयेत का...? सत्ताधारी आणि विरोधक आगामी निवडणुकीच्या कसे तयारीला लागलेत... ? या सगळ्याचा वेध पुणे लोकसभा मतदारसंघाचा आणि विधानसभा मतदारसंघाचा हा आढावा...
Oct 7, 2014, 05:37 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - आंबेगाव
पुणे जिल्ह्यातील बारामती नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांत प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणजे आंबेगाव मतदार संघ... कारण विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आंबेगावचं प्रतिनिधित्व करतात. सहावेळा निवडून आलेल्या वळसे पाटलांना यावेळी कुणाचं आव्हान असणारे पाहूया....
Oct 7, 2014, 05:01 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिंचवड
लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय समीकरण, आमदार लक्ष्मण जगताप यांचं मौन, शिवसेनेकडून इच्छुकांची वाढलेली गर्दी, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला वाद... या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे राजकीय आखाडे बांधणं भल्याभल्यांना कठीण झालं.
Oct 7, 2014, 04:55 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पुरंदर
पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे अंजीर आणि सिताफळाचा जिल्हा... खंडेरायाची जेजुरी आणि आचार्य अत्रेंची सासवड भूमीचा पुण्यवान वारसा लाभलेला हा पुरंदर मतदारसंघ... एकेकाळचा जनता दलाचा हा बालेकिल्ला आता शिवसेनेचा गड झालाय.
Oct 7, 2014, 04:41 PM ISTबाळा नांदगावकर ‘मनसे’चा गड राखणार?
२००९ साली 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चा झेंडा हाती घेत बाळा नांदगावकर शिवडी मतदार संघातून विधानसभेत दाखल झाले. पण, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र मनसेनं सपाटून मार खाल्ल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. लोकसभा निवडणुकीत नांदगावकरांना आपलं डिपॉझिटही गमवावं लागलंय. त्यामुळे ‘मनसे’चा हा गड राखणं आता बाळा नांदगावकरांसमोर एक आव्हानचं आहे.
Oct 3, 2014, 01:58 PM ISTपंकजा.... गोपीनाथ मुंडेंची छबी!
‘मी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा... त्यांची छबी’ असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यंदा दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरतायत... महत्त्वाचं म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर बीड मतदार संघातून निवडणूक लढवून केंद्रात जाण्याची मिळणारी संधी बाजुला सारून पंकजा यांनी विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीद्वारे पंकजाची लहान बहिण प्रीतम मुंडे – खाडे आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करत आहेत.
Oct 2, 2014, 04:45 PM ISTभायखळा मतदारसंघ : अभासेच्या गीता गवळींना सेनेचा पाठिंबा
अभासेच्या गीता गवळींना सेनेचा पाठिंबा
Oct 1, 2014, 12:35 PM IST