देवयानी प्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला खेद
न्यूयॉर्कमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना करण्यात आलेली अटक आणि देण्यात आलेली अपमानास्पद वागणुकीबाबत अमेरिकेनं अखेर माफी मागितलीय.
Dec 19, 2013, 09:19 AM ISTअमेरिकेचा उर्मटपणा कायम, देवायनींचा मेल
अमेरिकेतील भारतीय दुतावास कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल भारतामध्ये संतापाची लाट उसळलीय. परंतु तरीही अमेरिकेचा उर्मटपणा अद्याप कमी झालेला नाही. झाल्या प्रकाराबद्दल माफी मागण्याऐवजी अमेरिकेने चक्क या कृत्याचं समर्थन केलंय.
Dec 18, 2013, 10:38 PM ISTदेवयानी खोब्रागडे यांची युएनमध्ये कायमस्वरूपी बदली
अमेरिकेत अपमानित झालेल्या देवयानी खोब्रागडेंची युएनमध्ये कायमस्वरूपी बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे त्यांना संपूर्ण राजनैतिक अधिकार प्राप्त झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.
Dec 18, 2013, 06:04 PM ISTअमेरिकेच्या समलैंगिक अधिकाऱ्यांना भारतात अटक होणार?
भारताच्या दूतावास अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत मिळालेल्या अत्यंत अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ भारतानंही कधी नव्हे ते अमेरिकेला शिंगावर घेतलंय... खोब्रागडे प्रकरणामुळं भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध ताणले गेलेत.
Dec 18, 2013, 11:02 AM ISTअमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना ओळखपत्र परत करण्याचे आदेश
अमेरिकेच्या भारतीय राजनैतिक महिला अधिकाऱ्याला दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीनंतर भारतानं अमेरिकेला भारतात तैनात केलेल्या आपल्या सगळ्या राजनैतिक अधिकाऱ्यांची ओळखपत्र परत करण्याचे आदेश दिलेत.
Dec 17, 2013, 02:30 PM ISTडॉ. देवयानी खोब्रागडे यांची अमेरिकेत कपडे उतरवून चौकशी
भारताच्या राजनैतिक अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांची चक्क कपडे उतरवून चौकशी करण्यात आली. शिवाय अट्टल गुन्हेगार असलेल्या तुरूंगात ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत भारताने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या शिष्टमंडळास भेट देण्याचे भारताने टाळले आहे.
Dec 17, 2013, 12:59 PM ISTआदर्श सोसायटी सदस्य देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक
माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आणि वादग्रस्त आदर्श सोसायटीच्या सदस्य असलेल्या डॉ. देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आलीय.
Dec 13, 2013, 09:48 AM IST