doctors continue strike

निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे

निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे 

Mar 23, 2017, 06:29 PM IST

मुख्यमंत्र्यांनी संपकरी डॉक्टरांना फटकारले, सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळू नका!

राज्य सरकार डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा करण्यास तयार असून सर्वसामान्यांच्या हिताकरिता डॉक्टरांना आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कोणाला दिला नाही, असे त्यांनी फटकारले.

Mar 23, 2017, 01:15 PM IST

निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे

गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज चौथ्या दिवशी मागे घेतला. डॉक्टरांनी रुग्णांना वेठीस धरत संप पुकारला होता. आज मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी संप मागे घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तसेच सुरक्षा करण्याबाबत राज्य सरकारला स्पष्ट शब्दात बजावले.

Mar 23, 2017, 12:57 PM IST

सायन रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, तीन जणांविरोधात गुन्हा

सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली. या मारहाण प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mar 23, 2017, 11:59 AM IST

निवासी डॉक्टर्सच्या संपामुळे रुग्णांचे हाल

डॉक्टरांचा संपाचा चौथा दिवस आहे. रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली आहे. खासगी डॉक्टरांचाही संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. 

Mar 23, 2017, 10:25 AM IST

राज्यातील 40 हजार डॉक्टर संपावर

राज्यातील 40 हजार डॉक्टर संपावर, रुग्ण सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. रुग्णांचे हाल होत आहेत. डॉक्टरांना मारहाण झाल्याचा निषेध म्हणून डॉक्टर चौथ्या दिवशी संपावर आहेत. कारवाई करण्याची ठोस मागणी त्यांनी लावून धरली आहे.

Mar 23, 2017, 08:13 AM IST