earthquake

देशाला सेवा देणाऱ्या गोरखा रेजीमेंटचं संपूर्ण गाव उद्धवस्त

दिवसेंदिवस नेपाळमधील अनेक मोठ मोठ्या घटना समोर येत आहेत, नेपाळमध्ये ७.० तीव्रतेचा भूकंप होता. नेपाळमध्ये आतापर्यंत ४ हजार ३४७ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येतेय, हा आकडा १० हजाराच्या आसपास जाण्याची शक्यता देखिल व्यक्त केली जात आहे. 

Apr 28, 2015, 05:20 PM IST

नेपाळ भूकंप पीडितांना मदतीसाठी पुढे सरकावलं 'फेसबूक'

सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबूकनं आज आपल्या होमपेज वर 'डोनेशन'चं बटन दिलं आहे. याद्वारे यूजर नेपाळ भूकंप पीडितांसाठी मदतीसाठी पैसे पाठवू शकतो. याशिवाय फेसबूकनं १२,६८,२२,९०० रुपयांची मदत देऊ केली आहे. 

Apr 28, 2015, 02:56 PM IST

पाहा व्हिडिओ - जगभरातील भयानक भूकंप कॅमेऱ्यात कैद

जगभरात आतापर्यंत आलेल्या प्रलयकारी भूकंपाचे रौद्र रूप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पाहा हे भयानक व्हिडिओ... तुम्हांला हादरवू शकतात... 

Apr 28, 2015, 02:50 PM IST

भूकंपानंतर १० फूट दक्षिणेला सरकलं काठमांडू शहर

नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलं आहे. भूकंपाची तीव्रता एवढी मोठी होती की, मोठ्या प्रमाणावर वित्तहाणी, जीवितहानी तर झालीच मात्र नेपाळमध्ये काही भौगोलिक बदल देखील झाले आहेत. मात्र माउंट एव्हरेस्टच्या उंचीमध्ये कोणताही बदल न झाल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. 

Apr 28, 2015, 01:11 PM IST

भूकंप पीडित ५०० अनाथ मुलांना बाबा रामदेव घेणार दत्तक

योग गुरू बाबा रामदेव यांनी नेपाळ मधील भूकंपात अनाथ झालेल्या ५०० बालकांना दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. योगगुरू आचार्य बालकृष्ण यांच्यासोबत पंतजली योगपीठद्वारे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरानंतर बोलतांना, बाबा रामदेव यांनी घोषणा केली की भूकंप पीडितांना शक्य तितकी मदत केली जाईल. 

Apr 28, 2015, 11:46 AM IST

मुंबई-पुण्यासह देशातील ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर

नेपाळमधील भूकंपानं हजारो नागरिकांचे बळी घेतलेले असतानाच भारतातील मुंबई-पुण्यासहित ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर आहे. केंद्र सरकारनं आता त्या शहरांची यादी तयार केली आहे. त्यानुसार ६० टक्के भूभागावर विनाशाची टांगती तलवार लटकत आहे. 

Apr 28, 2015, 11:44 AM IST