farmers strike

तब्बल सात वर्ष चालला होता शेतकऱ्यांचा 'तो' संप!

तब्बल सात वर्ष चालला होता शेतकऱ्यांचा 'तो' संप!

Jun 1, 2017, 04:46 PM IST

शेतकऱ्यांनी ७०० लीटर दूध ग्रामस्थांना वाटले

शेतकऱ्यांच्या संपाला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. औसा तालुक्यातील चिंचोली काजळे या गावातील शेतकऱ्यांनी शहरात दूध न पाठविता जवळपास ७०० लीटर दूध ग्रामस्थांना वाटले.

Jun 1, 2017, 04:34 PM IST

पुणतांब्यातली जनतेने दुध टाकून न देता केली बासुंदी

 शेतकाऱ्यांनी अनेक ठिकाणी दूध फेकून देण्यात आलं आहे. पण जिथे शेतकरी संपाची पहिली ठिंणगी पडली त्या पुणतांब्यातली जनतेने या दुधाची बासुंदी केली आहे. शेतकऱ्यांनी हे दुध फेकून ने देता त्याची बासुंदी किंवा खवा बनवला आहे. काहींनी तर दूध हे आजुबाजुला वाटून दिलं.

Jun 1, 2017, 04:24 PM IST

संप मागे घ्या सरकार चर्चेला तयार - सदाभाऊ खोत

संप मागे घ्या सरकार चर्चेला तयार असल्याचं आज कृषी आणि पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. दुधाचे दर गेल्या महिन्यातवाढलेले आहे, दुधाचा एक ब्रँड व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो. दूध - भाजी फेकण्याचं आंदोलन करू नये असंही आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. 

Jun 1, 2017, 03:40 PM IST

शेतक-यांचा संपासाठी सरकार जबाबदार - पवार

माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सुरू झालेल्या शेतक-यांचा संपासाठी सरकार जबाबदार आहे असं म्हटलं आहे. आज बळीराजा संकटात आहे, तो रस्त्यावर उतरलाय, तो संघर्ष करतोय, त्याला साथ देण्याची गरज आहे. त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यकर्ते शहाणपणाचा निर्णय घेतील आणि त्याचे हित जोपासण्यासाठी हातभार लावतील ही अपेक्षा आहे, असं पवारांनी पुण्यात म्हटलं आहे.

Jun 1, 2017, 03:20 PM IST

शेतकरी संपावर जात आहे ही खूप गंभीर बाब - शरद पवार

शेतकरी संपावर जात आहे ही खूप गंभीर बाब असल्याचं राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.  शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाला आहे.

Jun 1, 2017, 09:18 AM IST

तब्बल सात वर्ष चालला होता शेतकऱ्यांचा 'तो' संप!

कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय. या संपानं शेतकऱ्यांच्या पहिल्या संपाची आठवण पुन्हा ताजी झालीय.

Jun 1, 2017, 08:50 AM IST

शेतकरी संपाचा दूध पुरवठ्यासह भाजीपाला, अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम

राज्यभरातल्या शेतक-यांनी उद्या १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय. शेतक-यांनी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.  

May 31, 2017, 06:40 PM IST

नाशिक : शेतकऱ्यांचे कांदेफेक आंदेलन

शेतकऱ्यांचे कांदेफेक आंदेलन 

Jun 12, 2016, 08:10 PM IST