fire

मंत्रालयाचा विमाच नाही!

महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे आणि प्रकरणांची कागदपत्र असणाऱ्या मंत्रालयाला आज दुपारी आग लागली. या आगीत अनेक कागदपत्रे खाक झाली. अनेक मोठ्या वास्तूंचा आणि त्यातील वस्तूंचा विमा उतरविला जातो. परंतु, मंत्रालयाचा विमाच उतरविला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jun 22, 2012, 07:22 AM IST

मंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू

मंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून अजून त्यांची ओळख पटलेली नाही. तर तिसरा व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Jun 21, 2012, 10:56 PM IST

मंत्रालयाच्या आगीत २४ जण गंभीर जखमी

मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.

Jun 21, 2012, 06:40 PM IST

LIVE : सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं...

मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.

Jun 21, 2012, 06:40 PM IST

'आदर्श'ची कागदपत्रे सुरक्षित?

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आज दुपारी लागलेल्या आगीत वादग्रस्त आदर्श सोसायटीचे कागदपत्रही जळाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

Jun 21, 2012, 06:38 PM IST

धुराचाही येतोय वास...

मंत्रालय म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्र सराकारचं मुख्यालय आगीच्या आज एका भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. त्यामुळे कशी लागली हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न...

Jun 21, 2012, 05:02 PM IST

नाशकात मॉलला आग, एकाचा मृत्यू

नाशिकमध्ये मुंबई नाक्याजवळ साखला शॉपिंग मॉलला लागलेली भीषण आग विझवण्य़ात अग्निशमन दलाला यश आलंय. या आगीत सुरक्षारक्षकाचा होरपळून मृत्यू झालाय. तर शॉपिंग मॉलचं कोट्यवधींचं नुकसान झाले आहे.

May 2, 2012, 09:23 AM IST

मानखुर्द येथे भंगार गोदामाला आग

मानखुर्द येथे आज शुक्रवारी सकाळी भंगाराच्या गोदामाला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दल नियंत्रण कक्षाने सांगितले. दरम्यान, शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.

Mar 30, 2012, 10:48 AM IST

कुर्ल्यात कपड्याच्या गोदामाला आग

मुंबईतल्या कुर्ला परिसरात काल रात्री आग लागल्याची घटना घडलीय. कुर्ला फ्लायओव्हरच्या खाली असलेल्या एका चामड्याच्या आणि कपड्याच्या गोदामाला रात्री साडेअकराच्या सुमारास ही आग लागली. नुकसानीचा आकडा समजू शकलेला नाही.

Mar 19, 2012, 10:14 AM IST

पुण्यात पुठ्ठ्याचा कारखाना आगीत खाक

पुण्यातल्या जुन्या बाजारात पुठ्ठ्याच्या कारखान्याला भीषण आग आगली. त्यामुळं आसपासची १५ ते २० दुकानं आणि झोपड्या भस्मसात झाल्या.

Feb 22, 2012, 01:03 PM IST

अमेरिकेत आगीत ३०० कैदी होरपळले

मध्य अमेरिकेतील हो्न्डुरासमध्ये कारागृहाला लागलेल्या आगीत 300 कैद्यांचा जळून मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती स्थानिक अग्निशामक विभागाने दिली.

Feb 16, 2012, 11:43 AM IST

मुंबईत सायनच्या आगीत एक ठार

मुंबईच्या नागपाडा इथल्या एका गोडाऊनला मोठी आग लागलीय. बेलाली रोडवरच्या राज ऑईल मिलच्या मागे हे गोडाऊन आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.

Feb 2, 2012, 11:07 PM IST

मुंबईत रहेजा चेंबरला आग

मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातील रहेजा चेंबरला आज सकाळी आग लागली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Jan 31, 2012, 11:22 AM IST

भिवंडीत डाईग कंपनीला भीषण आग

ठाण्यातल्या भिवंडी इंथ डाईग कंपनीला लागलेली भीषण आग अटोक्यात आलीय. भिवंडीतल्या धामनकर नाका परिसरातील मोदी डाईंग कंपनीला भीषण आग लागली होती.

Jan 14, 2012, 08:41 AM IST

नवी मुंबईत कंपनीला लागली आग

नवी मुंबईतल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये व्हीव्हीएस या साबण बनवण्याच्या कंपनीला रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. आग आटोक्यात आणली असली तरी आगीमुळं कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

Dec 13, 2011, 08:06 AM IST