ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घसरले
परदेशातून मंदीच्या बातम्या आल्यानंतर, सोन्याची मागणी कमी होतेय, म्हणून दिल्लीच्या सराफ बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. आज सोनं चौथ्या दिवशी २७ हजारांच्या खाली घसरलं. सोनं आठवड्यातील सर्वात खाली, प्रति १० ग्रँम घसरून २६ हजार ९७० रूपयांवर आलं आहे.
Feb 24, 2015, 07:58 PM ISTपाच दिवसात सोनं १ हजार १८० रूपयांनी वधारलं
ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८, ५०० रूपयांवर गेला आहे. सोन्यानं पाच महिन्यांतला उच्चांक गाठला आहे, बुधवारी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २८,५०० रुपये इतका झाला. गेल्या पाच दिवसांमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम १,१८० रुपये वधारलं आहे.
Jan 21, 2015, 08:12 PM ISTआयात नियंत्रणात सूट दिल्याने सोन्याच्या दरात घट
सोनेच्या आयातीवरील नियंत्रणात सूट दिल्यानंतर सोन्याचे भावात सतत घट होत आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव २०० रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे प्रति १० ग्रॅमला सोने २६२०० रुपये कमी झाले. ही किंमत २५००० पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईत काल सोने २६ हजार १५० रुपये होते ते आज २५ हजार ७३० पर्यंत खाली आहे.
Dec 1, 2014, 08:20 PM ISTखूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर!
तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचा मौसम सुरू होईल. त्यामुळं मुहूर्तांसाठी वधुपित्यांची घाई सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीनंतर सोन्याचे भाव हळूहळू घसरू लागल्यामुळं सर्वांनी आतापासूनच सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळं यंदा लग्नाचे बार आता दणक्यात उडणार आहेत.
Nov 5, 2014, 09:21 AM ISTवधुपित्यांना खुशखबर... सोनं ६०० रुपयांनी स्वस्त
तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मौसमाला सुरुवात होईल. फेब्रुवारीपर्यंत लग्नाचे बार उडतील. त्यामुळे मुहूर्त शोधण्यासाठी वधुपित्यांची लगबग सुरू झाली आहे. मुहूर्त सापडल्यानंतर बस्ता बांधण्यासाठी आणि सोनं खरेदीसाठी झुंबड उडेल. मात्र, लग्नसराईसाठी दणक्यात सोने खरेदी करणार्या वधुपक्षासाठी मोठी खुशखबर आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली असून वधुपित्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव घसरल्यामुळे सोने ६०० रुपयांनी उतरून २६ हजार ५०० प्रति तोळा इतके झाले आहे.
Nov 1, 2014, 09:58 AM ISTसोन्याचा भाव घसरला
राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावातील घसरण कायम राहिली. मुंबईतही सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. मुंबईत दहा ग्रॅमला (प्रति तोळा) 27,920 रुपये दर आहे.
Sep 3, 2014, 01:45 PM ISTखूशखबर! सोनं स्वस्त होणार!
२०१४-२०१५ या चालू आर्थिक वर्षात सोन्याची किंमत कमी होऊन २५,५०० ते २७,५०० प्रति १० ग्राम इतकी होऊ शकते. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चनं सांगितलं की, जगातील सोन्याच्या किमतीनुसार देशातही सोनं स्वस्त होईल.
May 9, 2014, 09:39 AM ISTसोने खरेदीसाठी गर्दी, काय आहे सोन्याचा दर
आज अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त. आजच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्व आहे. सोने खरेदीसाठी जळगाव प्रसिद्ध असल्याने सराफ भाजारात मोठी गर्दी आहे. जळगाव सराफ बाजारात सोन्याचा दर सध्या प्रतितोळा ३१ हजारावर आहे.
May 2, 2014, 09:22 AM ISTसोने, चांदी दरात घट, जागतिक मंदीचा परिणाम
सोन्याचा भाव १४०० रूपयांनी कमी झाल्याने सोने प्रति तोळा ३०,००० रूपये झाले आहे. जागतिक मंदीचा सोने दरावर परिणाम दिसून येत आहे. तर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सोने ३१,४२५ रुपये तोळा झाले.
Nov 28, 2013, 10:22 AM ISTसोनं स्वस्त, खरेदीदारांची चांदी!
थंडावलेला जागतिक बाजार आणि स्थानिक बाजारातही मागणी नाही... यामुळे सराफा बाजार मात्र काळजीत पडलेत. सोन्याचा दर आणखी कमी झालाय.
Jun 26, 2013, 08:34 AM ISTपहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल सोन्याचे दर घटले होते. सोन्याच्या दरात घट झाली होती.
Jun 5, 2013, 11:07 AM ISTपहा सोनं-चांदी आजचे दर: (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
Jun 1, 2013, 12:58 PM ISTपहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल देखील सोन्याच्या दरात वाढ झाली होती. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
May 31, 2013, 02:29 PM ISTसोन्याच्या किंमतीत घट, किंमतीत घसरण सुरूच
परदेशी चलनामध्ये झालेली घट यामुळे सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी २६,०००च्या खाली आली आहे.
May 18, 2013, 09:59 AM ISTसोने-चांदीचे पहा आजचे दर (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा घट झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने खरेदीत मात्र वाढ होणार आहे.
May 14, 2013, 11:57 AM IST