india vs south africa

आफ्रिकेविरुद्ध जिंकायचे असल्यास यांच्यापासून राहावे लागेल सावध

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा आज महत्त्वाचा सामना आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थिती हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.

Jun 11, 2017, 11:39 AM IST

भारत वि द. आफ्रिका : भारत सेमीफायनलमध्ये पोहोचणार?

भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या सामना होतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अ गटात इंग्लंड संघाने सेमीफायनल गाठलीये तर दुसरा संघ आज निश्चित होईल. ब गटात भारत, द. आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघाने दोन दोन सामने खेळलेत आणि त्यातील एक सामना जिंकलाय.

Jun 10, 2017, 12:25 PM IST

उमेश यादवने तोडला ५८ वर्षांचा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिेकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पाहुण्या संघाविरुद्ध ३३७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला खरा मात्र या विजयासोबतच अनेक विक्रमही प्रस्थापित झाले. 

Dec 8, 2015, 11:54 AM IST

आफ्रिकेविरुद्ध भारताचा चौथ्या कसोटीत ३३७ धावांनी विजय

आफ्रिकेविरुद्ध भारताचा चौथ्या कसोटीत ३३७ धावांनी विजय

Dec 7, 2015, 04:20 PM IST

अमलाच्या २४४ चेंडूत अवघ्या २५ धावा

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात धीम्या गतीने फलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत आता हाशिम अमलाच्या नावांचाही समावेश झालाय. भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवशी आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात अमला २५ धावा करुन बाद झाला. मात्र या इतक्या धावा बनवण्यासाठी त्याने तब्बल २४४ चेंडू खर्ची घातले. अमलाचा स्ट्राईक रेट प्रति ओव्हर ०.६१ इतका होता. 

Dec 7, 2015, 02:24 PM IST

भारताचा ऐतिहासिक मालिका विजय, आफ्रिकेला ३-० ने दिला व्हाईटवॉश

अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भारताने विजयासाठी दिलेले ४८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला

Dec 7, 2015, 09:43 AM IST

SCORE : चौथ्या दिवसअखेर आफ्रिका दोन बाद ७२

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला आणखी ४०९ धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून आफ्रिकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात ७२ धावा केल्यात. हाशिम अमला २३ आणि एबी डेविलियर्स ११ धावांवर नाबाद आहेत.

Dec 6, 2015, 09:48 AM IST

SCORE : भारताकडे भक्कम आघाडी

फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात भारताने ४०३ धावांची मजबूत आघाडी घेतलीये. 

Dec 5, 2015, 09:45 AM IST

मालिका विजयाचे श्रेय अश्विनला : विराट

भारताचा कसोची कर्णधार विराट कोहलीने सलग दोन मालिका जिंकण्याचे पूर्ण श्रेय फिरकीपटू आर. अश्विनला दिलेय. अश्विनने शुक्रवारी आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतीली दुसऱ्या डावात सात आणि एकूण मिळून १२ विकेट घेतल्या. त्यांच्या शानदार गोलंदाजीमुळे तिसऱ्या कसोटीसह भारताने ही मालिका २-० अशी जिंकली. 

Nov 28, 2015, 08:55 AM IST

नागपूर कसोटीसह भारताने मालिका जिंकली

नागपूर कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी १२४ धावांनी जिंकत मालिका खिशात घातली. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-० अशा फरकाने मालिका खिशात घातली. गेल्या नऊ वर्षात दक्षिण आफ्रिकेने परदेशात एकही मालिका गमावली नव्हती. भारताने त्यांचा हा विक्रम मोडीत काढला. कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा मायदेशातील हा पहिला मालिका विजय आहे. 

Nov 27, 2015, 03:53 PM IST

कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर गोलंदाजांचे वर्चस्व

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस पूर्णपणे गोलंदाजांनी गाजवला. दुसऱ्या दिवसाच्या संपूर्ण खेळात दोन्ही संघांतील तब्बल २० गडी बाद झाले.

Nov 26, 2015, 05:26 PM IST

टीम इंडियाचं नागपूर टेस्टमध्ये पारडं जड

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या नागपूरच्या विदर्भ मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाननं इतिहास घडवलाय. 

Nov 26, 2015, 12:06 PM IST

स्कोअरकार्ड : भारत Vs दक्षिण आफ्रिका (दुसरी कसोटी)

मोहालीत केवळ तीन दिवसांत पहिली कसोटी जिंकणाऱ्या टीम इंडियाने आता बंगळुरूलाही फिरकी त्रिकुटाच्या बळावर दुसरी कसोटी जिंकण्याचे  निर्धार केलाय. स्फोटक फलंदाज ए बी डी’व्हिलियर्सच्या कारकीर्दीतील या शंभराव्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला विजयापासून दूर ठेवण्याची रणनीती भारताने आखली आहे.

Nov 14, 2015, 09:33 AM IST

विकेट खराब नव्हती पण ही बॉलर्सची मॅच होती - कोहली

भारतानं जरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टेस्ट मॅच तीन दिवसांच्या आत जिंकली. तरी कॅप्टन कोहलीनं म्हटलं की, विकेटमध्ये काही कमतरता नव्हती. पण त्यानं कबुल केलं ही मॅच बॉलर्सची होती.

Nov 8, 2015, 05:01 PM IST