राज ठाकरेंनी घेतलं मोदींवर तोंडसुख
सरकारमध्ये येऊन नुसती आश्वासन... नुसत्या थापा... आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा... लोकं म्हणतात चल रे का भाजपा मारतोय... अशा खास ठाकरी शैली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.
Oct 9, 2015, 08:21 PM ISTमहायुतीच्या घटक पक्षांची संघर्षाची भूमिका
सत्तेत वाटा मिळत नसलेल्या भाजपाबरोबरच्या महायुतीतील पक्षांनी आता उघडपणे भाजपाविरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे. वारंवार भाजपाकडून केवळ पोकळ आश्वासन मिळत असल्याने या घटकपक्षांनी यापूर्वी अनेक वेळा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आता भाजपाला धडा शिकवण्यासाठी हे पक्ष भाजपाविरोधात संघर्ष करायला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. दुसरीकडे शिवसेनेचीही भाजपाविरोधातील नाराजी वाढत चालली आहे.
Oct 5, 2015, 04:18 PM ISTभाजप सरकार हे सुटबुटवाल्यांच थापाडे सरकार - अजित पवार
भाजप सरकार हे सुटबुटवाल्यांच थापाडे सरकार आहे, परदेशातून काळा पैसा आणण्याच आश्वासन देऊन ही अजून एक ही रूपया आला नसल्याची खरमरित टीका आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. याच बरोबर बिहारच्या निवडणूक लक्षात घेऊन सव्वा कोटी रूपयांची घोषणा करणार हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका ही अजित पवार यांनी केली.
Sep 25, 2015, 07:46 PM IST'पॉर्न की बात'वर सोनम कपूर भडकली
देशभरात पॉर्न साइट्सवर बंदीच्या निर्णयावर लोकांची नाराजी आणि उद्रेक दिसत आहे. आपली भडास काढण्यासाठी लोक सोशल मीडियाचा आधार घेत आहे. यात बॉलिवूड अभिनेत्रीचा समावेश आहे.
Aug 4, 2015, 09:48 PM ISTडॉ. कलामांचं नावही न लिहिता येणाऱ्या अनुष्कावर टीकेची झोड
एखाद्या चुकीबद्दल ट्विटरवासिय कुणालाही सोडत नाहीत... मग तो नेता असो वा सेलिब्रिटी... याचाच प्रत्यय आज अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आलाय.
Jul 28, 2015, 04:17 PM IST'तेलगी'वरून अजितदादांनी जितेंद्र आव्हांडाना झापले...
तेलगीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. सभागृहात तेलगीचा उल्लेख केल्यामुळं जितेंद्र आव्हाडांना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फैलावर घेतले.
Jul 23, 2015, 08:12 PM ISTशिवसेनेला कायदा समजत नाही : नारायण राणे
शिवसेनेला कायदा समजत नाही, शिवसेना आणि कायदा यांचा संबंध नाही. त्यामुळे प्रचार संपला असताना पत्रकार परिषद घेऊ नये असा कोणताही नियम नसल्याचा टोला माजी मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला.
Apr 10, 2015, 04:44 PM ISTराज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली- रामदास आठवले
संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, सूतासारखा सरळ करेन, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे. मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे लगावला.
Oct 23, 2014, 09:02 AM IST