mega block

एक्स्प्रेस वेवर आज 'मेगाब्लॉक', प्रवाशांची पावलं रेल्वे स्टेशनकडे

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील दरड हटवण्याचं काम आजपासून सुरू होणार आहे. हे काम पुढील आठवडाभर सुरू राहणार आहे. त्यामुळं या मार्गावरून नेहमी प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. हायवेवर होणारा खोळंबा टाळण्यासाठी अनेकांची पाऊलं आपसूक रेल्वे स्टेशनकडे वळलीयेत.

Jul 24, 2015, 09:21 AM IST

एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी 'मेगाब्लॉक'

शुक्रवार पासून सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत ब्लॉक घेवून धोकादायक दरडीतील दगड काढले जाणार आहेत. यासाठी मार्ग पूर्णवेळ बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. 

Jul 23, 2015, 08:29 PM IST

मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक रद्द

 

मुंबई : मध्य रेल्वेच्या डीसी ते एसी विद्युत परिवर्तानाचं आज मध्यरात्री करण्यात येणारे काम रद्द करण्यात आले आहे. शुक्रवारी घेण्यात आलेल्या चाचणी दरम्यान अनेक गाड्या रद्द झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. 

सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याशिवाय डीसी ते एसी विद्युत परिवर्तनाचे काम करण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. 

Jun 6, 2015, 08:09 PM IST

24, 25 आणि 26 जानेवारीला मेट्रो रेल्वेचा मेगाब्लॉक

 घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो रेल्वमार्गावर येत्या 24, 25 आणि 26  जानेवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेट्रो रेल्वे प्रशासनातर्फे गुरूवारी याबद्दलची माहिती देण्यात आली. त्यामुळे तीन दिवस सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत मेट्रोची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 

Jan 22, 2015, 08:20 PM IST

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कोकण रेल्वेच्या गाड्या लेट

पेण-रोहादरम्यान साडेचार तासांचा मेगाब्लॉक मध्ये रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून काही गाड्या रद्द केल्यात. तर कोकणकन्या उशिराने धावणार आहे.

Jan 9, 2015, 05:29 PM IST

सावधान, आज रात्रीपासून ‘मध्य रेल्वे’चा प्रवास टाळा!

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी... आज रात्रीपासूनच रविवारी सकाळपर्यंत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज रात्री मध्य रेल्वेवर प्रवास करणं प्रवाशांनी टाळावं, असं आवाहन करण्यात आलंय. 

Dec 20, 2014, 09:26 AM IST

लोकलचा आज मेगाब्लॉक, पाहा कधी, कुठे?

आज रविवार आणि मेगा ब्लॉक असल्याने मुंबई आणि उपनगरांत तुम्हाला कुठंही जायचं असेल, तर मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार  आहे.

Oct 26, 2014, 10:35 AM IST

मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर सकाळी 9.45 ते दुपारी 3.15 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तर हार्बर लाईनवर सीएसटीहून पनवेल, बेलापूर आणि वाशीला जाणाऱ्या तसंच तेथून सीएसटीला निघणाऱ्या लोकल सकाळी 10.15 ते दुपारी 3वाजेपर्यंत धावणार नाहीत.

Jul 27, 2014, 09:10 AM IST