mulayam singh yadav

समाजवादी पक्षातली यादवीवर मुलायम सिंह यादव दुःखी

समाजवादी पक्षातली यादवीवर पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव दुःखी झालेत.. सपातील राजकीय नाट्याच्या दुस-या अंकात मुलायम सिंह यादव यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होणार असल्याचं समजतंय. या बैठकीला खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य आणि पक्षातील मोठे नेते सहभागी होणार आहेत.

Oct 24, 2016, 07:27 AM IST

अखिलेश यादव स्थापन करणार नवा पक्ष, मोटरसायकल असणार पक्षचिन्ह

समाजवादी पक्षामध्ये सध्या बरेच वाद सुरु आहेत. अखिलेश यादव आणि जुन्या नेत्यांमध्ये काहीही अलबेल नसल्याचं दिसतंय. आता यातच एक मोठी बातमी अशी येते आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव स्वत:चा नवा पक्ष सुरु करण्याच्या विचारात आहे. अखिलेश यादव समाजवादी पक्षातून बाहेर पडतील अशी चर्चा सुरु झाली आहे.

Oct 23, 2016, 01:47 PM IST

उत्तर प्रदेशात कौटुंबिक 'यादवी', अखिलेश-शिवपालमध्ये लढाई

उत्तर प्रदेशात 2017मध्ये होणाऱ्या निवडणूकीला अवघे काही महिने उरलेले असताना, सत्ताधारी समाजवादी पार्टीतला कौटुंबिक कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.

Sep 15, 2016, 09:32 AM IST

व्हिडिओ : 'सैफई' महोत्सवात 'बाजीराव' वादात!

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्याकडून वर्षाच्या सुरुवातीला उत्तरप्रदेशात आयोजित केला जाणाऱ्या सैफई महोत्सवाची खूप चर्चा होते. ती यावर्षीही होतेय... परंतु, यावेळी बॉलिवूड स्टार रणवीर सिंहला मात्र ही चर्चा भारी पडणार असंच दिसतंय.  

Jan 13, 2016, 09:39 AM IST

'माझ्या आशीर्वादामुळेच प्रियांका बनली टॉप हिरोईन'

प्रियांका चोपडा ही आपल्या आशीर्वादामुळे मोठी स्टार बनल्याचं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव म्हणतायत. 

Dec 30, 2015, 04:28 PM IST

समाजवादीची काँग्रेसला 'ऑफर', मुलायम PM तर राहुल Deputy PM

समाजवादी पार्टीने काँग्रेसला 'ऑफर' देऊ केली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी अट लागू केलेय. जर मुलामयसिंह यादव यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास काँग्रेस तयार असेल तर आम्ही त्यांच्याशी आघाडी करु, असे असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. 

Dec 4, 2015, 11:22 PM IST

मुलायम सिंगचे मोठे वक्तव्य, बिहारमध्ये भाजपची सरकार येणार

 बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुलायम यांनी सोमवारी म्हटले की, बिहारमध्ये वातावरण भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्याचे सरकार बनू शकते हे सत्य आहे. आम्हांला वाटते की बदल हवा आहे. मुलायम सिंग यांनी भाजपच्या चांगल्या कामांची प्रशंसा केली. 

Oct 12, 2015, 08:06 PM IST

यूनोला पत्र लिहून देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला - उद्धव ठाकरे

दादरी हत्याप्रकरणी यूनोला पत्र लिहिणाऱ्या आझम खान यांच्यावर शिवसेनेनं जहाल टीका केलीय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला, या शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडलं.

Oct 7, 2015, 11:14 AM IST

बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, मुलायमसिंगांना पटविण्यासाठी लालूंची धावपळ

महाआघाडीतून मुलायम सिंग यादव बाहेर पडल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांची धावाधाव सुरू झालीय. 

Sep 4, 2015, 05:41 PM IST

मोदींना शह देण्याआधीच हे काय?

बिहारमध्ये मुलायम सिंह यादव यांचा समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार आहेत. नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय समाजवादी पक्षाच्या संसदीय दलाने घेतलाय. मोदींना शह देण्याआधीच आघाडीत फूट पडली.

Sep 3, 2015, 09:01 PM IST

'एक दिवसाचा पगार लोकसभेने नेपाळला द्यावा'

लोकसभेमधील सदस्यांनी आपला एक दिवसाचा पगार नेपाळसाठी द्यावा, असे आवाहन समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी आज केले.  नेपाळमध्ये घडलेल्या भीषण भूकंपाच्या घटनेसंदर्भात मुलायम सिंह यादव बोलत होते.

Apr 27, 2015, 08:19 PM IST

जनता परिवार एक पण मतभेद कायम

जनता परिवार एक झाला असला तरी अजूनही सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीत. जनता परिवाराचं नाव काय असावं आणि चिन्ह कोणतं असावं, यावरून अद्यापही मतभेद आहेतच. मोदींच्या विरोधात एकवटलेल्या जनता परिवाराचं पुढं काय होणार, असा प्रश्न निर्माण होतोय.

Apr 16, 2015, 08:56 PM IST

मोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!

मोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग! 

Apr 15, 2015, 08:14 PM IST

मोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!

मोदी सरकारविरोधात 'जनता परिवार'मध्ये बुधवारी सहा पक्ष एकत्र आलेत. या नव्या पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत मुलायम सिंह यादव... 

Apr 15, 2015, 07:43 PM IST