मुलायम सिंगचे मोठे वक्तव्य, बिहारमध्ये भाजपची सरकार येणार

 बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुलायम यांनी सोमवारी म्हटले की, बिहारमध्ये वातावरण भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्याचे सरकार बनू शकते हे सत्य आहे. आम्हांला वाटते की बदल हवा आहे. मुलायम सिंग यांनी भाजपच्या चांगल्या कामांची प्रशंसा केली. 

Updated: Oct 12, 2015, 08:06 PM IST
मुलायम सिंगचे मोठे वक्तव्य, बिहारमध्ये भाजपची सरकार येणार title=

नवी दिल्ली :  बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुलायम यांनी सोमवारी म्हटले की, बिहारमध्ये वातावरण भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्याचे सरकार बनू शकते हे सत्य आहे. आम्हांला वाटते की बदल हवा आहे. मुलायम सिंग यांनी भाजपच्या चांगल्या कामांची प्रशंसा केली. 

मुलायम सिंग यादव यांच्या या वक्तव्याने राजकारण चांगलचं तापलं आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर मुलायम सिंह यादव यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. 

मुलायम सिंग यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, नीतिश कुमारन लालू प्रसाद यादव यांना धोका दिला आहे. लालूला ज्या व्यक्तीने जेलमध्ये पाठविले आता गरज पडली तर त्यांच्याशी हात मिळवणी केली आहे. 

कैमूर जिल्ह्यातील जगजीवन स्टेडिअममध्ये एका प्रचार सभेत ते बोलत होते.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.