पुणे- वाढत्या तापमानामुळे मूतखड्यांच्या प्रकराणांमध्ये वाढ; काय आहेत लक्षणं जाणून घ्या
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. या दिवसांमध्ये मूत्रमार्गाचे संक्रमण आणि मूतखड्याचे विकार होतात. पाठीत किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, मळमळ आणि लघवीतून रक्त येणे, वारंवार लघवी येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत जी मूतखड्यामुळे संबंधीत व्यक्तींमध्ये आढळतात. पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्याने ही स्थिती टाळता येते. अशावेळी दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
May 26, 2024, 12:16 PM IST