rr patil

मुंडेंनी आठ कोटी आणले कुठून?- आर आर पाटील

राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी थेट मुंडेंवर निशाणा साधला आहे. आर. आर. पाटील यांनी मुंडेंच्या वक्तव्यावर टीका केली आहे. निवडणूकीसाठी मुंडेंनी ८ कोटी रुपये आणले कुठून? असा थेट सवाल त्यांनी मुंडेंना या सभेत केला आहे.

Jun 30, 2013, 07:16 PM IST

गृहमंत्री आर. आर. पाटील करणार गुन्हेगारांचा प्रचार?

सांगली महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणारे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीने गोची केली आहे. आजवर ज्यांना गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरविण्यात आले, अशा गुन्हे नोंद असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिल्याने आता त्यांचाही प्रचार गृहमंत्र्यांना करावा लागणार आहे.

Jun 21, 2013, 11:23 AM IST

आबा नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर!

राज्याचे गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील हे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचं उघड झालंय.

May 30, 2013, 11:12 PM IST

नक्षलवादावरून आर आर पाटील यांची सरकारवर टीका

नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी सक्षम यंत्रणेची वारंवार मागणी करूनही राज्य सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप गृहमंत्री आर आर पाटील यांनी केलाय.

May 27, 2013, 10:28 PM IST

बसमधील स्फोट फटाक्यांमुळेच - आर आर

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे शुक्रवारी झालेल्या बसमधील स्फोट हा फटाके आणि शोभेच्या दारूमुळे झाल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज सांगितले.

May 12, 2013, 04:04 PM IST

पनवेलमध्ये झमझम, पोलिसांवर कारवाई

पनवेल शहरातील कपल डान्सबारवर कारवाई करण्यात आली तरी आता पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तसे स्पष्ट संकेत गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिलेत. ज्यांच्या हद्दीत कपल डान्स बार सुरू होता, अशा सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आर. आर. यांनी शनिवारी दिले.

May 5, 2013, 10:46 AM IST

अजित दादांचं आत्मक्लेश उपोषण संपलं

कराडमध्ये यशवंतरावांच्या समाधीस्थळी सकाळपासून सुरु केलेलं आत्मक्लेश उपोषण अजित पवार यांनी सोडलं. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली.

Apr 14, 2013, 07:56 PM IST

भंडारा बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी

भंडारा बलात्कार प्रकरणाच्या सीबीआय चौकशी होणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.

Apr 1, 2013, 06:51 PM IST

आबा देणार आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळनिधीला

राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळ निधीसाठी देऊन एक नवा पायंडा पाडलाय. ५७ हजार रुपयांचं वेतन त्यांनी मुख्यमंत्री सहाय्य निधीला दिलं आहे.

Feb 8, 2013, 05:36 PM IST

आर आर पाटील आणि नारायण राणे यांच्यात जोरदार खडाजंगी

आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत नवे औद्योगिक धोरण आणि महिलांवरील अत्याचारांवरून गृहमंत्री आर आर पाटील आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जोरदार खडाजंगी झाली.

Jan 9, 2013, 06:46 PM IST

नक्षलवादावरून 'दादा-आबां'मध्ये वाद

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्षलवादाच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना टार्गेट केलंय. काल रात्री उशीरा झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यात वाढत असलेल्या नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केला.

Jun 7, 2012, 08:14 AM IST

हल्ल्यानंतर केंद्राने तुणतुणे वाजवू नये- आबा

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे खापर केंद्र सरकारवर फोडलंय. विधिमंडळात नक्षलवादावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं.

Mar 29, 2012, 05:49 PM IST

नक्की काय! मंकी मॅन की चड्डी बनियान टोळी

मंकी मॅन आणि चड्डी बनियान टोळीच्या अफवांनी मुंबईकर पुरते दहशतीखाली आहेत आणि त्यातूनच चोर सोडून भलत्याच लोकांना मारहाणीचे प्रकारही वाढले आहेत. असे असताना नक्की काय! मंकी मॅन की चड्डी बनियान टोळी, याचीच चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्याना, मंकी मॅनच्या अफवा पसरवणारी टोळी असू शकते, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पुण्यात संशय व्यक्त केला आहे. पोलीस या टोळीचा छडा लावतील असं त्यांनी गुरुवारी सांगितलं.

Mar 2, 2012, 09:08 AM IST