www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता केद्र आणि राज्यांमध्ये राजकारण रंगायला सुरूवात झालीय. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी सक्षम यंत्रणेची वारंवार मागणी करूनही राज्य सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप गृहमंत्री आर आर पाटील यांनी केलाय.
नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी मोक्का आणि टाडासारख्या कठोर कायद्याची गरजही गृहमंत्र्यांनी व्यक्त केलीय. नक्षलग्रस्त भागाचा विकास करण्यासाठी MMRDA आणि MSRDA सारखी स्वंतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केलीय. याबाबत मागणी करुनही कुणी गंभीर दखल घेत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी राज्यातील प्रशासन आणि सत्ताधारी काँग्रेसलाही धारेवर धरलय.
छत्तीसगडमधल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यावरून राजकारण तापलंय. काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीला पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती असाही आरोप काँग्रेसनं केलाय. तर भाजपनं काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.