अमेरिका करणार सीरियावर हल्ला!
अमेरिकेनं अखेर सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असून या हल्ल्याबाबत अमेरिकेतल्या संसदेचीही मंजूरी मिळाली असल्याचं ओबामांनी स्पष्ट केलं.
Sep 1, 2013, 10:31 AM ISTसीरिया हल्ल्याचा तेलाच्या किमतींना फटका
सीरियावर मिलिटरी अॅक्शनसाठी पश्चिमेतल्या महासत्ता एकवटत असल्याचा फटका तेलांच्या किंमतींना बसलाय. एशियन मार्केट्समध्ये या आठवड्यातले सर्वात जास्त भाववाढ तेलाच्या किंमतीत पाहायला मिळालीय.
Aug 28, 2013, 01:41 PM ISTसीरियावर हल्ल्याआधी आम्हाला माहिती द्याः अमेरिकन संसदेत मागणी
सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांना पायबंद घालण्यासाठी सीरियावर मर्यादित लष्करी कारवाई करण्याची तयारी अमेरिकेनं चालविली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं नसल्याचं व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आलंय. तर सीरियावर हल्ल्या करण्याआधी बराक ओबामा यांनी आम्हाला माहिती द्यावी, अशी मागणी अमेरिकन संसदेनं केलीय.
Aug 28, 2013, 12:17 PM ISTसिरियात आत्मघातकी कार बॉम्बस्फोट
दमिस्कसमध्ये एका सैनिकी विमानतळाजवळील सैन्य चौकीवर झालेल्या कार बॉम्बस्फोटात काही जवान मृत्युमुखी पडलेत तर २० जवान जखमी झाल्याची माहिती ‘मानवी हक्क आयोगाच्या’ सिरियन निरीक्षकांनी दिलीय.
Jun 17, 2013, 11:24 AM ISTसिरियात तीन बॉम्बस्फोट, ४० ठार
सिरियाची उपराजधानी अलेप्पो शहराच्या मध्यवर्ती भागात तीन बॉम्बस्फोटाचे धमाके झाले. या स्फोटामुळे दहशतीचे वातारवरण तेथे पसलले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोट घडविण्यासाठी कारचा वापर करण्यात आला.
Oct 3, 2012, 03:17 PM ISTचार देशांना घोषित केलं 'आतंकवाद प्रायोजक राष्ट्रं'
अमेरिकेने पुन्हा क्युबा, इराण, सुदान आणि सीरिया या चार देशांना दहशतवादाला प्रायोजत्व देणारे देश म्हणून घोषित केलं आहे. तसंच त्यांच्यावर शस्त्रांचा व्यापार आणि आर्थक सहाय्य इत्यादी गोष्टींवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.
Aug 1, 2012, 09:05 AM ISTसीरियात यादवी संघर्ष; ११६ जण मृत्यूमुखी
दमिश्क नजीकच्या उपनगरांत रिपब्लिकन चौक्यांजवळ सीरियन सैन्य आणि विद्रोही यांच्यात झालेल्या संघर्षात आत्तापर्यंत ११६ जण ठार झालेत. एका देखरख समितीनं ही माहिती दिलीय. देशभरात आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.
Jun 27, 2012, 04:26 PM ISTसिरियातील हिंसाचार थांबवा - संयुक्त राष्ट्रे
सिरियामध्ये एका गावात झालेल्या ९२ नागरिकांच्या हत्याकांडाचा संयुक्त राष्ट्रांनी तीव्र निषेध केला. सिरियातील वाढता हिंसाचार थांबविण्याचे आवाहन करताना मानवतेला काळिमा फासणा-या अशा नरसंहाराला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांनी केले आहे.
May 28, 2012, 01:29 PM ISTसीरियावर आंतरराष्ट्रीय दबाव
आंतरराष्ट्रीय समुहाद्वारे सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्यावर दबाव टाकण्याची वेळ आली आहे. तसेच, सीरियाच्या नागरिकांना पाठिंबा दर्शविणारा संदेश पाठविला पाहिजे, असे अमेरिकेच्या राज्य सचिव हिलरी क्लिंटन यांनी सांगितले.
Feb 1, 2012, 01:47 PM ISTलष्कराच्या गोळीबारात सीरियात ४० ठार
दिवसागणित सीरियात हिंसाचारात वाढ होत आहे. संघर्ष टिपेला पोहोचला आहे. लष्कर आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये, सीरियामध्ये आजपर्यंत किमान ४० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती मानवाधिकारांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेने आणि नागरिकांनी दिली आहे.
Jan 28, 2012, 03:07 PM ISTसिरियातील हिंसाचारात ६९ जण ठार
सिरियाच्या दक्षिण भागात राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्याशी एकनिष्ठ असलेली फौज आणि सेनादलातून पळ काढणाऱ्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात ६९ जण ठार झाल्याचं वृत्त आहे. अरब लीगने सिरियाचे सदस्यत्व निलंबीत करण्याच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार भडकला आहे. असाद यांनी गेले आठ महिने त्यांच्या विरोधात असलेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सेनादलाचा वापर केला आहे.
Nov 15, 2011, 05:11 PM IST