सीरियात यादवी संघर्ष; ११६ जण मृत्यूमुखी

दमिश्क नजीकच्या उपनगरांत रिपब्लिकन चौक्यांजवळ सीरियन सैन्य आणि विद्रोही यांच्यात झालेल्या संघर्षात आत्तापर्यंत ११६ जण ठार झालेत. एका देखरख समितीनं ही माहिती दिलीय. देशभरात आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.

Updated: Jun 27, 2012, 04:26 PM IST

www.24taas.com, बैरुत, सीरिया

दमिश्क नजीकच्या उपनगरांत रिपब्लिकन चौक्यांजवळ सीरियन सैन्य आणि विद्रोही यांच्यात झालेल्या संघर्षात आत्तापर्यंत ११६ जण ठार झालेत. एका देखरख समितीनं ही माहिती दिलीय. देशभरात आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.

‘दि सीरियाई ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राईटस्’च्या म्हणण्यानुसार मृतांमध्ये ६८ नागरिक, ४१ सैनिक आणि सात विद्रोही यांचा समावेश आहे. दश्मिकपासून जवळजवळ आठ किलोमीटर अंतरावर 'कुदसिया' आणि 'अल हामा'मध्ये रिपब्लिकन गार्डच्या चौक्यांजवळ विद्रेही नागरिक आणि सैनिक यांच्यात संघर्ष झाला. सैनिकांनी केलेल्या गोळीबारात 'अलहामा'त १५ जण तर 'कुदसिया'मध्ये ११ जण तर 'दश्मिक'मध्ये २८ जण मारले गेले, असं ऑब्जर्वेटरी या संस्थेचे प्रमुख रामी अब्देल रहमान यांनी म्हटलंय.

अब्देल रहमान यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनानं यावेळी पहिल्यांदाच यादवी युद्धामध्ये तोफांचा उपयोग केलाय. दश्मिकमधला सर्व व्यवहार, संपर्क करण्याची साधनं ठप्प असल्याचं दमिश्कमधल्या कार्यकर्त्यांचे प्रवक्ते अबू उमर यांनी म्हटलंय.

.