water problem

विलासरावांच्या लातुरात दुष्काळ

राज्याच्या इतर भागाप्रमाणे मराठवाड्याला दुष्काळाचा झळा बसतायेत. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात तर दुष्काळाची तीव्रता जरा जास्तच आहे. मात्र तिथल्या नेत्यांना दुष्काळाची फारशी चिंता असल्याचं दिसत नाही.

May 17, 2012, 03:56 PM IST

पाणीप्रश्नावर आंदोलन - अण्णा हजारे

राज्यातल्या पाणीप्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सराकारने योग्य कारवाई न केल्यास मोठं आंदोलन उभारलं जाईल अंसही अण्णा म्हणाले.

May 17, 2012, 10:24 AM IST

झी २४ तासमुळे डेंगनमाळमध्ये पाणी!

ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील डेंगनमाळसह इतर गावातील पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. डेंगनमाळमधील पाण्याच्या प्रश्नाची व्यथा झी 24 तासनं प्रथम मांडली होती. त्यानंतर जाग आलेल्या सरकारनं 5000 लीटरच्या पाण्याच्या दोन टाक्या गावात बसवल्यात.

May 16, 2012, 04:14 PM IST

मुंबईतल्या आदिवासींसाठी चिखलाचं पाणी

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी सध्या कोरडं आयुष्य जगत आहेत. कुठल्याही प्रकारची पाणी मिळण्याची साधनं उपलब्ध नसल्यामुळे मिळेल त्या पाणवठ्यावर चिखलाचं पाणी भरावं लागतं.

May 11, 2012, 08:46 PM IST

पाण्यासाठी पायपीट

मुरबाड तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या 178 योजना सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र त्यातले जवळपास 90 टक्के पैसे ठेकेदारांनी वसूल केलेत. परिणामी अनेक गावं आज तहानलेली आहेत.

May 9, 2012, 09:31 PM IST

पाण्याची तहान ठरली जीवघेणी

वणवण करतांना ठाणे जिल्ह्यात घरासाठी पाण्याचे हंडे भरणाऱ्या पार्वती जाधव हिचा पाणी भरताना मृत्यू झाला आहे. विहिरीजवळच झालेल्या या मृत्यूने शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा करणारी योजनेतील फोलपणा उघड झालाये

Apr 23, 2012, 06:13 PM IST

राष्ट्रपतींच्या सूनबाई करतायेत पाण्यासाठी वणवण

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आता त्याच्या झळा खुद्द देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या माहेरगावालाही बसत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या नाडगाव या राष्ट्रपतीच्या गावात पाणीटंचाईनं भीषण रुप धारण केलं आहे.

Apr 15, 2012, 01:13 PM IST

विदर्भात पाण्यासाठी वणवण

वाढत्या पाऱ्यासोबतच विदर्भात पाण्यासाठीची वणवणही वाढीस लागली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पाणीप्रश्न गंभीर झालाय. एप्रिलमध्येच ही परिस्थिती असताना, संपूर्ण मे महिन्यात काय होणार, याची भीता साऱ्यांनाच वाटतेय.

Apr 10, 2012, 01:11 PM IST

मुंबईत २५% पाणी कपात

मुंबईकरांसाठी हा विकेंड पाणीकपातीचा असणार आहे. मध्य वैतरणा प्रकल्पाचे जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं मुंबईच्या कुलाबा, मलबार हिल, भेंडीबाजार, नळबाजार, माझगाव, खार, माहीम, वरळी आणि दादर या भागात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी २५ टक्के पाणीकपात होणार आहे.

Jan 5, 2012, 09:49 AM IST