water

मुंबई, पुणेकरांसाठी खुशखबर, पाण्याचे संकट दूर

 मुंबईकरांसाठी पावसानं चांगली बातमी आणलीय. तुळशी आणि मोडकसागर तलावाच्या पाठोपाठ तानसा तलावही भरलाय. त्यामुळे मुंबईवचे पाणी संकट दूर झालेय. तर इतके दिवस पुणेकरांवर रुसलेला पाऊस अखेर पुणेकरांवर प्रसन्न झालाय. पुण्यातली पाणीकपात मागे घेण्यात आलीय. 

Aug 5, 2014, 09:28 AM IST

बदलापूरमध्ये कार तुंबलेल्या पाण्यात फसली आणि...

बदलापूर शहरात बेलवली इथे रेल्वे ट्रॅकखालून जाणा-या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात  एक कारचालक अडकला. हा भुयारी मार्ग पाण्याने तुडुंब भरला होता. तरीही उत्साही कार चालकाने शहाणपणा करीत कार पाण्यात घाल्याने त्याच्या जीवावरच बेतले. ग्रामस्थांनी धावाधाव करून  कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

Jul 26, 2014, 09:46 PM IST

पाण्यापासून मोबाईल जपण्याच्या काही टीप्स

आता पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. तसेच आपला स्मार्टफोन आणि मोबाईल पाण्यापासून कसा सुरक्षित राहील, याबाबत काही टीप्स.

Jul 15, 2014, 04:11 PM IST

'पाणी म्हणजे पैका...'; पण, सरकार भिकारी!

तहान लागल्यावर विहीर खोदायची सवय राज्य सरकारला लागलीय. यंदा पावसानं ओढ दिल्यानं राज्यात तीव्र पाणीटंचाईचं संकट उभं राहिलंय. पाण्याचं दूरगामी नियोजन करावंसं सरकारला वाटतंय, पण ते टंचाई निर्माण झाल्यावर... राज्यातील पाण्याचं नियोजन करण्यात जलसंपदा खातं कसं कमी पडतंय, हे आता उघड झालंय.

Jul 15, 2014, 01:06 PM IST

राज्यातल्या नद्या कोरड्या, तापी दुथडी!

एकीकडे महाराष्ट्रातल्या सर्व नद्या कोरड्या पडल्या असताना तापी नदीला मात्र भरपूर पाणी आहे. ४५ लाख लोकांना दररोज एक वर्षभर पाणी पुरवठा करता येईल इतकं पाणी या नदीच्या तीन बॅरेजेसमध्ये आहे. 

Jul 10, 2014, 08:24 PM IST