5G Work On 4G Smartphone:4G स्मार्टफोनवर 5G सेवा वापरता येणार का? जाणून घ्या

सर्वंच कंपन्या 5G सिम आणतायत, मग 4G स्मार्टफोनच करायच काय? स्मार्टफोन विकावा लागणार कि सेवा वापरता येणार? 

Updated: Oct 15, 2022, 04:45 PM IST
 5G Work On 4G Smartphone:4G स्मार्टफोनवर 5G सेवा वापरता येणार का? जाणून घ्या title=

मुंबई : भारतात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. या 5G सेवेची घोषणा होताच टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom Company) देखील 5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या संबंधित सेवा काही शहरात सुरु झाली आहे. ही सेवा सुरु होताच, आता ग्राहकांना 4G स्मार्टफोनमध्ये (Smartphone) 5G सेवा वापरता येणार का? असा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात. 

भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओ (Jio) आणि एअरटेलने (Airtel) दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीसह 8 शहरांमध्ये त्यांची सेवा सुरु केली आहे. अशा स्थितीत ग्राहकांना अनेक प्रश्न भेडसावतायत.जुन्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) 5G चालेल का? विशेषत: अशा लोकांच्या फोनमध्ये ज्यांच्याकडे 4G स्मार्टफोन आहेत. तसेच, सध्या अनेक ग्राहकांच्या 5G स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क येत नाही.

 
जुना स्मार्टफोन निरूपयोगी होणार का? 

तुमच्याकडे 4G फोन असल्यास, 5G सेवा सुरू केल्याने ते निरुपयोगी ठरणार नाहीत. उलट 5G नेटवर्क आल्यानंतरही तुम्ही 4G स्मार्टफोन (Smartphone) वापरण्यास सक्षम असाल. विशेष म्हणजे तुम्हाला यावर 5G स्पीड मिळणार नाही, परंतु तुम्ही चांगले नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटीचा लाभ घेऊ शकाल.

 

5G सेवा कधी मिळणार?

भारतात 5G सेवा आतापर्यंत फक्त 8 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे.तीही पूर्णपणे सुरु झाली नाही आहे.त्याऐवजी, वापरकर्त्यांना फक्त काही भागांमध्ये 5G नेटवर्क मिळत आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्या (Telecom Company) त्याचा झपाट्याने विस्तार करत आहेत.

 

टेलिकॉम कंपन्यांच म्हणण काय? 

देशभरात 5G सेवा सुरू होण्यासाठी मार्च 2024 पर्यंत वेळ लागणार आहे. जिओने (Jio) एका निवेदनात म्हटले आहे की, पुढील वर्षाच्या अखेरीस त्यांची 5G सेवा संपूर्ण देशात पोहोचेल. तसेच जिओने 1000 शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. त्याचवेळी, एअरटेलचे (Airtel) म्हणणे आहे की, त्यांची 5G सेवा मार्च 2024 पर्यंत उपलब्ध होईल.

दरम्यान जर तुम्ही सणासुदीत नवीन स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नक्की 5G स्मार्टफोन खरेदी करा. जेणेकरून तूम्हाला 5G सेवेचा लाभ घेता येईल.