मुंबई : टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या दरात मोठी वाढ केल्य़ाने दोन सिम कार्ड अॅक्टीव्ह ठेवणे नागरीकांना आर्थिकरित्या फारचं अडचणीचे ठरत आहे. त्य़ामुळे अनेक नागरीकांचे एकच सिम चालू आहे तर दुसरे बंद आहे. मात्र काही नागरीक दुसरा सिम अॅक्टीव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज करत आहे. त्यामुळे दोन सिम कार्डमध्ये महिन्याला रिचार्ज केल्याने नागरीकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र आता हा आर्थिक भूर्दंड आता बसणार नाही आहे.कारण आता सिम अॅक्टीव्ह ठेवण्यासाठी एक कंपनी सर्वांत स्वस्तातला प्लान घेऊन आली आहे.
रिचार्जच्या दरवाढीने आता सर्वंच प्लॅन शंभरीपार गेले आहेत. त्यात जर सिम अॅक्टीव्ह ठेवण्याचं जरी म्हटलं तरी मोठा रिचार्ज मारावाचं लागतो. त्यामुळे दोन्ही सिम अॅक्टीव्ह ठेवणे ग्राहकांना आर्थिकरित्या फारचं अडचणीचे ठरत होते. त्यामुळे आता बीएसएनएलने सिम अॅक्टीव्ह ठेवण्यासाठी सर्वांत स्वस्त प्लॅन आणला आहे.या प्लॅनमध्ये नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
6 महिने रिचार्ज करण्याची गरज नाही
बीएसएनएल कंपनी व्हॉईस कटर प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 19 रुपयांचा रिचार्ज करून एक महिन्यासाठी सिम अॅक्टीव्ह ठेवता येणार आहे. तसेच सध्या सिम अॅक्टीव्ह ठेवण्यासाठी दर महिन्याला ग्राहक 100-120 चा रिचार्ज करत आहेत. मात्र याच किंमतीत बीएसएनएलचा सिम 6 महिने अॅक्टीव्ह राहणार आहे.म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला 6 महिन्यांसाठी फक्त 114 रुपये खर्च करावे लागतील. या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्ही 228 रुपयांमध्ये बीएसएनएलचे सिम वर्षभर अॅक्टीव्ह ठेवू शकता.
बीएसएनएलचा ऑन-नेटवर्क आणि ऑफ-नेटवर्क कॉल्सची किंमत 20 पैसे प्रति मिनिटापर्यंत खाली येते. या प्लॅनसह ग्राहकाकडे इतर कोणताही डेटा प्लॅन किंवा सेवा नसली तरीही त्यांचा नंबर सक्रिय राहील.हा प्रीपेड प्लान Airtel, Vodafone Idea (Vi) आणि Jio पेक्षा खूपच स्वस्त आहे.