Base Variant of 4 star Hatchback Tata Tiago: जर तुम्ही स्वस्तात मस्त अशा फॅमिली कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतात एकापेक्षा एक अशा स्टायलिश आणि पॉवरफूल हॅचबॅक आहेत. त्यापैकी टाटा टियागो हा चांगला पर्याय ठरू शकतो. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या गाडीकडे पाहीलं जातं. या गाडीला 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. या गाडीत आवश्यक सर्व फीचर्स आहेत. पण तुम्हाला अधिकचे फीचर्स नको असतील तर हॅचबॅक कारचं स्वस्त मॉडेल घेऊ शकता. हे मॉडेल तुमच्या बजेटमध्ये बसेल, चला तर मग याबाबत जाणून घेऊयात.
टाटा टियागोच्या बेस मॉडेलमध्ये टॉप मॉडेलच्या तुलनेत कमी फीचर्स मिळतील. पण सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही कमतरता नाही. कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही कसर सोडलेली नाही. बेस मॉडेल पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह बाजारात उपलब्ध आहे. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार मॉडेल निवडू शकतात. या मॉडेलची किंमत 5,39,900 (एक्स-शोरुम) इतकी आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये
या मॉडेलमध्ये तुम्हाला BS6 कंप्लायंट 1.2-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 85 बीएचपी कमाल पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. जर तुम्ही स्पीड प्रेमी असाल, तर हे इंजिन तुम्हाला थोडे निराश करू शकते, कारण यात जास्त पिकअप मिळणार नाही. पण सुरक्षिततेच्या दृष्टीने एकदम परफेक्ट कार आहे.